EXCLUSIVE कारभारी लयभारी : प्रियंकाचं मंगळसूत्र जिंकणार प्रेक्षकांचं मन

लवकरच अडकणार विवाहबंधनात 

Updated: Feb 27, 2021, 04:32 PM IST
EXCLUSIVE कारभारी लयभारी : प्रियंकाचं मंगळसूत्र जिंकणार प्रेक्षकांचं मन  title=

मुंबई : झी मराठीवरील(Zee Marathi)  प्रत्येक मालिका ही प्रेक्षकांच्या मनात घर करत असते. या मालिकेतील प्रत्येक गोष्ट ट्रेंडी असते. मालिकेतील अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात. अगदी मग ते मालिकेतील अभिनेत्रींच्या मंगळसूत्रापासून ते बोलण्याच्या स्टाइलपर्यंत. आता झी मराठीवर 'कारभारी लयभारी' (Karbhari Laybhari) ही मालिका खूप गाजत आहे. या मालिकेत राजवीर आणि प्रियंका हे दोघं लग्न करणार आहेत. या दोघांचा विवाह सोहळा लवकरच आपल्याला पाहायला मिळणार आहे. 

या दोघांच्या लग्नासोबतच आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा रंगणार आहे. ते म्हणजे प्रियांकाच्या मंगळसुत्रांची. या अगोदर झी मराठीवरील 'होणार सून मी या घरची' मधील जान्हवी म्हणजे तेजश्री प्रधानचं मंगळसुत्र असंच व्हायरल झालं होतं. अगदी महाराष्ट्रातील समस्त महिला वर्गाने या मंगळसुत्राला पसंती दर्शवत आपलं खरं मंगळसुत्र तसं बनवून घेतलं होतं. (EXCLUSIVE : 'कारभारी लयभारी' : राजवीर आणि प्रियांकाच्या विवाह सोहळ्याची रंगत न्यारी) 

याचप्रमाणे प्रियंकाचं म्हणजे अभिनेत्री अनुष्का सरकटे हिचं मंगळसुत्र पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल होणार आहे. 'कारभारी लयभारी' या मालिकेतील प्रियांका राजवीरला कायमच 'कारभारी' या नावाने हाक मारते. हेच नाव तिने आपल्या मंगळसुत्रात लिहिलं आहे. 

अनुष्का सरकटेचं  हे मंगळसुत्र ज्वेलरी डिझाइनर धनश्रीने तयार केलं आहे. मालिकेतील हे मंगळसुत्र नक्कीच प्रेक्षकांचं मन जिंकेल आणि सोशल मीडियावर व्हायरल होतील.