सोनाली बेंद्रेची लव्हस्टोरी तुम्हाला माहित आहे का?

सोनाली बेंद्रे कॅन्सरवर करतेय मात 

सोनाली बेंद्रेची लव्हस्टोरी तुम्हाला माहित आहे का? title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला कॅन्सर असल्याचं काही दिवसांपूर्वीच उघड झालं. आणि तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. सध्या सोनाली बेंद्रे तिच्या आजारावर न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतल आहे. या कठिण प्रसंगी तिचा नवरा गोल्डी बहल तिच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. सोनालीने सोशल मीडियावर तिचा न्यू हेअर कटसोबतचा फोटो शेअर केला. ज्यामध्ये ती अतिशय भावुक दिसली आणि त्या फोटोत गोल्डी तिला शांत करत होता. पण एकेकाळी अशी परिस्थिती होती की, सोनाली गोल्डीला बघणं देखील पसंद करत नसे. जाणून घेऊया सोनालीची लव्हस्टोरी... 

सोनालीच्या लव्हस्टोरीतील खास गोष्टी 

1) गोल्डी आणि सोनालीची पहिली ओळख 1994 मध्ये 'नाराज' च्या सेटवर झाला. सोनाली त्यावेळी बॉलिवूडमधील लोकप्रिय स्टार होती. आणि तिचे चाहते खूप होते. सोनालीला पहिल्यांदाच बघता गोल्डी फिदा झाला होता. 

2) एका मुलाखतीत गोल्डीने सांगितलं होतं की, माझ्या बहिणीने माझी सोनालीची भेट करून दिली होती. गोल्डी सांगतो की, तुम्हाला विश्वास बसणार नाही पण सोनाली सगळ्यात हळू जेवण जेवायची आणि तेच मला खूप सर्वात पहिलं आठवलं होतं. आम्ही एकत्र जेवत असू आणि तिच्या या हळू जेवणाच्या सवयीवर मी टिपणी केली होती तेव्हा सोनाली खूप नाराज झाली होती. मात्र त्यानंतर आमच्यात जी भिंत होतील ती दूर झाली. 

3) 'नाराज' या सिनेमाची शुटिंग संपल्यावर गोल्डी भरपूर नाराज झाले होते. कारण त्याला सोनालीला भेटता येणार नव्हतं. यानंतर गोल्डीने महेश भट्ट यांच्यासोबत असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केलं. त्या सिनेमांत मी देखील काम करत होतो. 

4) असं असताना गोल्डीला पुन्हा एकदा सोनालीसोबत काम करण्याची संधी मिळाली. हळू हळू या दोघांची मैत्री घट्ट झाली. गोल्डीने एका मुलाखतीत म्हटलं की, यानंतर तिने अंगारे या सिनेमांत काम केलं. तेव्हा गोल्डी दिग्दर्शकाचे सर्व निरोप सोनालीला देत असे. हे काम गोल्डीला इतकं आवडत असे कारण सोनालीसोबत मला अधिक संवाद साधता येत असे. 

5) सुरूवातीला हे प्रेम एकतर्फा होतं. गोल्डी काहीही करून सोनालीकडे आपलं प्रेम व्यक्त करू इच्छित होता. मात्र त्यांना भिती वाटत होते की, आपली मैत्री खराब होऊ नये असं त्याला वाटत असे. या दोघांचे काही कॉमन फ्रेंड्स होते ज्यांच्यासोबत हे कायमच पार्टीला जात असे