अखेर शिल्पाचा ऑनस्क्रिन पती सापडला

बॉलिवूडची फिटनेस गर्ल शिल्पा शेट्टी लवकरच रूपेरी पडद्यावर पुन:पदार्पण करणार आहे. 

Updated: Sep 24, 2019, 12:12 PM IST
अखेर शिल्पाचा ऑनस्क्रिन पती सापडला  title=

मुंबई : अभिनय क्षेत्रापासून बराचकाळ लांब असलेली बॉलिवूडची फिटनेस गर्ल शिल्पा शेट्टी लवकरच रूपेरी पडद्यावर पुन:पदार्पण करणार आहे. तब्बल ११ वर्षांनंतर ती 'निकम्मा' चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या अभिनयाची जादू चाहत्यांच्या मनावर पसरवणार आहे. स्वत:च्या अभिनय कौशल्याने तिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. चित्रपटामध्ये तिच्या पतीची भूमिका अभिनेता समीर सोनी सकारणार आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Back on the setswith Nikamma in the role of Avni. Can’t tell you HOW much I missed thisWe are going to have so much fun abhimanyud , love you sabbir even when you are trying to cover your stomach with the clap.Wah !! Really Clapworthy irstday ##nikamma #backtowork #actor #actormode #work #love #gratitude #fun #team #sonypicturesindia

शिल्पा बद्दल बोलताना समीर म्हणला की, 'शिल्पाला मी अनेकवेळा भेटलो आहे. गणपती उत्सवात देखील मी तिच्या घरी गेलो होतो. बिग बॉस ४ मध्ये तिने मला नेहमी पाठिंबा दिला. माझी पत्नी निलमसोबत सुद्धा तिची चांगली मैत्री आहे. शिल्पाच्या या प्रोजेक्टमध्ये माझी प्रमुख भूमिका आहे.' अशा प्रकारे त्याने शिल्पाचे कौतुक केले. 

समीर सध्या 'मुंबई सागा' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात तो एका गॅंगस्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे. ऑक्टोबरमध्ये समीर 'निकम्मा' चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. त्याचबरोबर समीर अभिनेते अमिताभ बच्चन स्टारर 'द बिग बुल' या चित्रपटात सुद्धा झळकणार आहे.