Entertainment : सोनाक्षी सिन्हाचा चेहरा रिना रॉयशी का जुळतो? अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा चेहरा जुन्या काळातील अभिनेत्री रिना रॉयशी अगदी मुळता जुळाता आहे, यावर तीला अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आले, अखेर तीने यावर उत्तर दिलं आहे

Updated: Jan 10, 2023, 07:17 PM IST
Entertainment : सोनाक्षी सिन्हाचा चेहरा रिना रॉयशी का जुळतो? अखेर अभिनेत्रीने सोडलं मौन title=

Reena Roy on Sonakshi Sinha: बॉलिवूडचे (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते शत्रूघ्न सिन्हा (Shatrughan Sinha) यांची मुलगी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हीने जेव्हापासून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आहे, तेव्हापासून एकाच गोष्टीची जास्त चर्चा आहे, ती म्हणजे सोनाक्षी सिन्हाचा चेहरा जुन्या काळातील अभिनेत्री रिना रॉय (Reena Roy) हिच्याशी मिळता जुळता आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये अनेक चित्रविचित्र प्रश्न उपस्थित करण्यात आले. इतकंच काय तर काही वेळा वादही झाला होता. आता सोनाक्षी सिन्हाने यावर मौन सोडलं आहे. 

कोण आहे रिना रॉय
1970 च्या दशकात रिन रॉय प्रसिद्ध अभिनेत्री होती. रिना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यानी अनेक चित्रपटात एकत्र भूमिका साकारली आहे. एकवेळ अशी होती की दोघांच्या प्रेमसंबंधांची (Reena Roy - Shatrughan Singha Love Story) हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलीच चर्चा रंगली होती. शत्रुघ्न सिन्हा आता राजकारणात (Member of the Lok Sabha) रंगले आहेत तर रिना रॉय या गेल्या अनेक दशकापासून लाईमलाईटपासून दूर आहेत. पाकिस्तान क्रिकेटर मोहसिन खानशी (Pakistan Cricketer Mohasin Khan) लग्न करुन रिना रॉय पाकिस्तानमध्ये स्थायिक झाल्या आहेत. 

सोनाक्षी सिन्हाने सोडलं मौन
रिना रॉय यांनी चित्रपट सृष्टी सोडून दिल्याला आता काही दशकं उलटली आहेत, पण अजूनही त्यांची चर्चा आहे. याला कारण सोनाक्षी सिन्हा. सोनाक्षीमध्ये चाहत्यांना रिना रॉयचा चेहरा दिसतो. यावर आता सोनाक्षी सिन्हाने मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत सोनाक्षी सिन्हाला याबाबत प्रश्न विचारण्यात आला. याला उत्तर देताना सोनाक्षीने हा केवळ योगायोग असल्याचं म्हटलं आहे. यासाठी तीने एक उदाहरणही दिलं. ज्येष्ठ अभिनेते जीतेंद्र यांची आई आणि आपल्या आईचा चेहरा इतका मिळता जुळता होता की जुळ्या बहिणीच वाटाव्यात असं सोनाक्षीने सांगितलं.

रिना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांचं नातं
चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी रिना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हाशी जोडला गेलेला एक किस्सा सांगितला. रिना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा भावनिक रित्या एकमेकांशी जोडले गेले होते. रिना रॉयने शत्रुघ्न सिन्हा यांना अल्टिमेटमही दिला होता. माझ्याशी लग्न केलं नाही तर आठ दिवसात दुसऱ्या कोणाशी तरी लग्नगाठ बांधेन असं रिना रॉयने म्हटलं होतं. त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा यांचं पूनम यांच्याशी लग्न झालं होतं. 

रिना रॉय आणि शत्रूघ्न सिन्हा यांच 'हथकडी' हा चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर पुढच्या आणखी एका चित्रपटात रिना रॉय, शत्रुघ्न आणि संजीव कुमार एकत्र काम करणार होते. पण रिना रॉय यांनी चित्रपटाची ऑफर नाकारली. शत्रुघ्न सिन्हा जेव्हा लग्नासाठी होकार देतील तेव्हाच आपण या चित्रपटात काम करु अशी अटच रिना रॉय यांनी ठेवली होती. जेव्हा पहलाज निहलानी यांनी ही अट शत्रूघ्न सिन्हा यांनी सांगितली तेव्हा ते भावनिक झाले. त्यांनी रिना रॉयला फोन केला आणि त्यावेळी ते खूप रडलेही होते. 

शेवटी रिना रॉय यांनी मोहसिन खानशी लग्न केलं आणि चित्रपटातून कायमचा ब्रेक घेतला.