Bedroom Secrets: ''आम्ही दोघं कायम एकमेकांसोबत..." अभिनेता Milind Soman नं आपल्या सेक्स लाईफबद्दल केला खुलासा

Milind Soman and Ankita Konwar Bedroom Secrets: गेली वीस वर्ष मॉडलिंग क्षेत्रात आपलं नावं कमावणारा अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) आपल्या लग्नामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. याआधी त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं होतं. परंतु सध्या तो अंकितामुळे विशेष चर्चत आहे. 

Updated: Dec 20, 2022, 06:24 PM IST
Bedroom Secrets: ''आम्ही दोघं कायम एकमेकांसोबत..." अभिनेता Milind Soman नं आपल्या सेक्स लाईफबद्दल केला खुलासा  title=
Milind Soman and Ankita Konwar

Milind Soman and Ankita Konwar Bedroom Secrets: गेली वीस वर्ष मॉडलिंग क्षेत्रात आपलं नावं कमावणारा अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण (Milind Soman) आपल्या लग्नामुळे कायमच चर्चेत राहिला आहे. याआधी त्याचं नाव अनेक अभिनेत्रींशी जोडलं होतं. परंतु सध्या तो अंकितामुळे विशेष चर्चत आहे. आपल्या बेडरूम सिक्रेट्सविषयीही मिलिंद सोमणनं धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्या वयाच्या 57 व्या वर्षाही मिलिंद सोमण खूपच हॉट दिसतो. सध्या त्याच्या आणि अंकिताच्या (Ankita Konwar) लग्नाची सगळीकडेच चर्चेत सुरू असते. सध्या आपल्या सेक्स लाईफमुळे (Sex Life) ते दोघं पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्या वयाच्या 57 मध्ये मिलिंद सोमणनं आपल्यापेक्षा वयानं लहान असणाऱ्या मुलीशी तीन वर्षांपुर्वी लग्न केले आहे. त्यावेळी तो स्वतः 53 वर्षांचा होता आणि अंकिता कोंवर त्याच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान होती. तेव्हा तिचे वय फक्त 26-27 वर्षे होते. (entertainment news milind soman shares his bedroom secrets with wife ankita konwar)

मिलिंद आणि अंकितानं पहिल्यांदाच आपल्या सेक्स लाईफबद्दल खुलासा केला आहे. त्यावर बोलताना मिलिंद आणि अंकितानं आपले अनेक बेडरून सिक्रेट्स (Bedroom Secrets) सांगितले आहेत. एका मुलाखतीत मिलिंद सोमणनं एक धक्कादायक खुलासा केला होता. त्याला त्याच्या बेडरूम सिक्रेट्सबद्दल एक प्रश्न विचारण्यात आला असता तो म्हणाला की, असे प्रश्न मला तरी फार क्वचित विचारले जातात. पण माझं सेक्स लाईफ हे खूप साधं सिंपल आहे. मला मी अंकिताच्याच वयाचा वाटतो. आम्ही दोघं कायम एकमेकांसोबत चांगला वेळ व्यक्तित करतो. आपल्या नात्यात खूप मोकळेपणा आहे. आपल्या नात्यात खूप आनंदही आहे. अंकिता तर माझ्यापेक्षाही जास्त फीट आहे, असं तो यावेळी म्हणाला होता. 

मिलिंद यापुर्वी अनेकदा कॉर्ट्रोव्हर्सीसमध्ये अडकला होता. तो आजही अनेक तरूणींच्या दिलकों धडकन आहे. 1996 साली त्यानं एका अभिनेत्रीसोबत केलेलं न्यूड फोटोशूट (Nude Photoshoot) आजही चर्चेचा विषय आहे. वीस वर्षांपुर्वी आलेल्या मेड - इन - इंडिया (Made in India Song) या गाण्यानं त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. मिलिंद आणि अंकिताने 2018 साली लग्न केले. लग्नाच्या अनेक वर्षांपूर्वी दोघे एका नाईट क्लबमध्ये भेटले होते. अंकिताला पाहाताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. त्या रात्रीनंतर अंकिता आणि मिलिंद एकमेकांचे चांगले मित्र झाले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले.

अंकिताचा भूतकाळ आणि मिलिंदचं प्रेम 

अंकिताच्या बॉयफ्रेंडचा (Boyfriend) मृत्यू झाल्यानं अंकिता उदास होती तर मिलिंदचा याआधीच घटस्फोट झाला होता. त्यावेळी त्या दोघांनी एकमेकांना सांभाळले आणि त्यांनी एकमेकांना डेट करायला सुरूवात केली. एप्रिल 2018 मध्ये त्यांनी लग्न केले.  त्यावेळी त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती.  मिलिंद आणि अंकिता सोशल मीडियावर जेवढे स्वतःला फिट दाखवतात तेवढेच ते प्रत्यक्षातही आहे. त्याचसोबत मिलिंदची आईही वयाच्या 80 व्या वर्षी खूपच फीट आहे. एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ द इयर 2 (MTV Super Model of the Year 2) चे मिलिंदनं जजिंग केले होते.