Pathaan Controversy: अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचा (Deepika Padukone) आगामी चित्रपट 'पठाण' (Pathaan) मधल्या 'बेशरम रंग' (Besharam Rang) या गाण्यावरुन सध्या चांगलाच वाद पेटला आहे. गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या बिकिनीला आक्षेप घेण्यात आलाय. मुद्दाम भगव्या रंगाची बिकिनी घातल्याचा आरोप हिंदू संघटनांनी (Hindu Sanghatana) केलाय. बेशरम गाण्यासारखेच दीपिकानेही तसेच कपडे घातल्याची टीका संघटनांनी केलीय. पठाण चित्रपट बॅन करण्याचीच मागणी आता संघटनांनी केलीय. तर सोशल मिडीयावरही देखील बायकॉट पठाणचा #BoycottPathan ट्रेंड पहायला मिळतोय.
भगव्या बिकीनीवरुन वाद
बहुचर्चित 'पठाण' चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी या चित्रपटातील 'बेशरम रंग' हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात दीपिकाचा ग्लॅलमरस लूक पाहिला मिळतोय. चाहतेही तिच्या या लूकवर जबरदस्त फिदा झाले आहेत. गाणं सोशल मीडियावर प्रदर्शित झाल्यापासून लाखो लोकांनी पाहिलंय. पण या गाण्यात दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या बिकनीवरुन आता नवा वाद सुरु झाला आहे. दीपिकाच्या ऑऊटफिटवर हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला असून 'पठाण' चित्रपट बॅन करण्याची मागणी केली जात आहे.
बॉलिवूड आणि भगवे कपडे
पण दीपिकाच्या आऊटफिटवरुन आताच वाद का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बॉलिवूडमध्ये एखाद्या अभिनेत्रीने केशरी किंवा राजकीय भाषेत भगव्या रंगाची बिकिनी परिधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात अभिनेत्रींनी भगवी बिकिनी-मोनोकिनी परिधान केली आहे. कॉकटेल चित्रपटात दीपिका पदुकोणने भगव्या बिकनीत सैफ अली खानबरोबर किसिंग सीन दिला होता. अभिनेत्री वाणी कपूरही यात मागे नाही. अभिनेता हृतिक रोशनसोबतच्या 'वॉर' चित्रपटातील 'घुंगरू टूट गये' या गाण्यात, वाणी कपूर भगव्या रंगाच्या बिकिनीत दिसली होती. तर 'बार बार देखो' या चित्रपटातील 'आँखों को तेरी आदत है' या गाण्यात कतरिनाने भगव्या रंगाच्या बिकनीत समुद्रात बोल्ड सीन दिले होते.
जुन्या काळातील अभिनेत्रीही भगव्या कपड्यात
चित्रपटात अभिनेत्रींनी भगल्या रंगाची बिकनी परिधान केल्याने वाद सुरु आहे. पण याआधी मुमताजपासून डिंपल कपाडियापर्यंत आणि काजोलपासून माधुरी दीक्षितपर्यंत अनेक अभिनेत्रींनी भगव्या साडीत मादक अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. विशेष म्हणजे त्यावेळी कोणीच यावर आक्षेप घेतला नव्हता.
बॉलिवूडचा गोल्डन इरा
आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर... या गाण्यात अभिनेत्री मुमताजने भगव्या रंगाची साडी परिधान केली होती. पण हेच गाणं आताच्या काळात चित्रीत करण्यात आलं असतं तर कदाचित या गाण्यावरही आक्षेप घेण्यात आला असता. ऋषी कपूरबरोबर जाने दो ना या गाण्यात डिंपल कपाडीयाने भगव्या कपड्यांवर केलेल्या डान्सवर कोणीच आक्षेप घेतला नव्हता. त्यावेळची बिनधास्त समजली जाणारी अभिनेत्री झीनत अमानने हाय, हाय, ये मजबूरी या गाण्यात पावसात भिजताना राजेश खन्ना यांच्याबरोबर केलेल्या डान्स मुव्हज आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत.
टिप टिप बरसा पाणी या प्रचंड लोकप्रिय झालेल्या गाण्यात रवीना टंडन हिने भगव्या ड्रेसवर केलेला डान्स चाहते कसा विसरतील. त्यावेळी रवीना टंडनच्या अदांवर सर्वच फिदा झाले होते. इतकंच काय तर माधुरी दीक्षितच्या 'धक धक करने लगा' या गाण्याने त्यावेळी सर्वांनाच वेड लावलं होतं. भगव्या ड्रेसमध्ये माधुरी दीक्षितने केलेले हावभाव चाहत्यांना घायाळ करणारे होते.
दे देना दन या चित्रपटात कतरीना कैफने अक्षय कुमारबरोबर 'मेरी इतनी सी चाहत है' या गाण्यावर भगव्या बिकनीमध्ये पाण्यात आग लावली होती. याशिवाय सुष्मिता सेन, काजोल, दिशा पटानी या अभिनेत्रींनीही भगव्या कपड्यात अनेक गाणी चित्रीत केली आहेत. आता प्रश्न असा आहे की याआधीही भगव्या बिकनी किंवा भगव्या कपड्यांचा वापर बॉलिवूड चित्रपटात झाला आहे, मग आताच दीपिकाच्या भगव्या बिकनीवरुन वाद का?
मध्य प्रदेशात हा चित्रपट प्रदर्शित करायचा की नाही, याबद्दल विचार केला जाईल, असा इशारा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिलाय. तर दीपिकानं भगवी बिकनी घातल्यामुळे सनातन संस्कृतीचा अपमान झाल्याची टीका अयोध्येतले महंत राजू दास यांनी केलीय.