Janhvi Kapoor Rumoured Boyfriend Shikhar Pahariya: बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरची (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर चांगलाची चर्चा असते. कधी पार्टींमुळे तर कधी बिकनी फोटोंमुळे ती सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत असते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिची जोरदार चर्चा रंगतेय आणि यावेळी कारण ठरलंय ते तिच्या रिलेशनशिपचं. जान्हवी कपूर आणि तिचा कथित बॉयफ्रेंड शिखर पहाडिया (Shikhar Pahariya) यांचा तिरुपती बालाजीचं दर्शन (Tirupati Balaji) करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. (Janhvi Kapoor Visits Tirupati Balaji Temple With Rumoured Boyfriend Shikhar Pahariya )
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
जान्हवी आणि शिखरचा तिरुपती बालाजी दर्शनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्या दोघांच्या रिलेशनशीपची चर्चा रंगली आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत जान्हवी ट्रेडिशनल लूकमध्ये (Treditional Look) दिसत आहे. तीने दाक्षिणात्या पारंपारिक पेहराव परिधान केला आहे तर शिखर पहाडियानेही देखील पारंपारिक धोतर आणि उपरणं परिधान केलेलं दिसत आहे. हा व्हिडिओ जान्हवीच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. लाखो चाहत्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. चाहत्यांनी जान्हवी-शिखरच्या जोडीला पसंती दर्शवली आहे.
धडक या चित्रपटातून जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जान्हवीने याआधीच एक मुलाखतीत सांगितलं होतं, की ती खूप धार्मिक आहे. याआधीही तीने अनेकवेळा तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं आहे. पण यावेळी ती पहिल्यांदाच कथित बॉयफ्रेंड शिखरसोबत दिसल्याने चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मालदिवमध्ये एकत्र
याआधी जान्हवी आणि शिखर अनंत अंबनीच्या लग्नात एकत्र दिसले होते. त्यानंतर मालदीव व्हेकेशनवरही ते दोघे एकत्र गेले होते. या दोघांनी आपल्या रिलेशनशीपबदद्ल कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
कोण आहे शिखर पहाडिया?
शिखर पहाडिया महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांना तीन मुली आहेत. यापैकी शिखर हा स्मृती शिंदे यांचा मुलगा आहे. स्मृती शिंदे यांचं लग्न उद्योगपती संजय पहाडिया यांच्याबरोबर झालंय. शिखरचा भाऊ वीर हा सारा अली खानला डेट करत असल्याची चर्चा होती. शिखर हा प्रोफेशनल पोलो प्लेअर आहे असून तो 25 वर्षांचा आहे.
जान्हवी कपूरचं दक्षिण चित्रपटसृष्टीत पदार्पण
जान्हवी ज्यूनिअर एटीआरसह 'एनटीआर30' (NTR 30) या चित्रपटाच्या माध्यमातून दक्षिण चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने दक्षिणेत असलेल्या जान्हवीने तिरुपती बालाजी देवस्थानाचं दर्शन घेतल्याचं बोललं जात आहे.
बोनी कपूरबरोबर दिसला होता शिखर
जान्हवी कपूरचे वडीला आणि चित्रपट दिग्दर्शक बोनी कपूरबरोबर काही दिवसांपूर्वी शिखर पहाडीया दिसला होता. बोनी कपूर आणि शिखर पहाडियाचा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.