मुंबई : अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी त्यांच्या नात्याचा खुलासा देखील केला. एवढंच नाही तर दोघे अनेक ठिकाणी एकत्र दिसत. कोणताही सण, कार्यक्रम किंवा दोघांचे वाढदिवस असो दोघे कायम एकत्र असतात. पण यंदाच्या नववर्षाचं स्वागत मलायका-अर्जुनला एकत्र करता आलं नाही.
त्याचं कारण म्हणजे पुन्हा वाढत असलेला कोरोना. अर्जुन कपूर पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात सापडल्यामुळे, त्याच्यावर उपचार सुरू आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी अर्जुनसोबत नसल्यामुळे त्याची आठवण सतत मलायकाला सतावत आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून मलायकाने आपल्या भावना व्यक्त केल्या.
मलायकाने सोशल मीडियावर अर्जुनसोबत एक फोटो शेअर करत पोस्ट केली, ज्यामध्ये मलायकाने अर्जुनसाठी मिस यू... म्हणत नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलायकाची ही पोस्ट सध्य सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
काही दिवसांपूर्वी अर्जुन कपूरसह अंशुला, रिया कपूर आणि तिचा पती करण बुलानी यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या सर्वजण क्वारंटाईनमध्ये असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.
अर्जुन कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर मलायका अरोराची देखील कोविड चाचणी करण्यात आला, मात्र तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.