खरंच रणबीर सिक्रेट अकाऊंटवरुन सोशल मीडियावर सक्रीय? ओळख लपवून ठेवतोय बॉलिवूडवर नजर

Ranbir Kapoor use secret Instagram Account : बॉलिवूडवर लक्ष ठेवण्यासाठी रणबीर कपूर खरंच वापरतो सिक्रेट इन्स्टाग्राम अकाऊंट...

दिक्षा पाटील | Updated: Feb 24, 2024, 12:55 PM IST
खरंच रणबीर सिक्रेट अकाऊंटवरुन सोशल मीडियावर सक्रीय? ओळख लपवून ठेवतोय बॉलिवूडवर नजर title=
(Photo Credit : Social Media)

Ranbir Kapoor use secret Instagram Account :  बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचं कोणत्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट नाही हे आपण अनेकदा ऐकतो. पण तरीही त्याचे अनेक फॅन पेज आहेत. त्याचे वेगवेगळे हॅशटॅगही आहेत. जे कायम सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे पाहायला मिळते. तो कुठेही स्पॉट झाला की त्याचे फोटो हे फॅनपेजवर पाहायला मिळतात. दरम्यान, एका सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असा दावा करण्यात येत आहे की रणबीर कपूरचं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे आणि ते त्याचं अनऑफिशियल अकाऊंट आहे. 

खरंतर, रेडीटवर हा दावा करण्यात येत आहे की इन्स्टाग्रामवर रणबीर कपूरचं जे अकाऊंट आहे त्याचं नाव Reymar_1528 असं आहे. तिथे हा दावा करण्यात आला आहे की नेमार आणि रणबीरच्या नावाचं हे कॉम्बिनेशन आहे. नेमारनं हा फुटबॉलचा एक दिग्गज खेळाडू आहे. त्यानं एफसी बार्सिलोना या टीमसाठी तो खेळला आहे. दरम्यान, ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, त्याला प्रश्न विचारण्यात आला होता की त्याचं इन्स्टाग्रामवर अनऑफिशियल अकाऊंट आहे? तर रणबीरनं या गोष्टीला नकार दिला. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक खोटी स्माईल असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं. सोशल मीडियावर आजही असा दावा करण्यात येत आहे की Reymar_1528 या नावात असलेले आकडे हे रणबीर आणि आलियाच्या वाढदिवसाची तारिख दर्शवतात. 

सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी यावरून डिस्कशन सुरु केलं असून म्हटलं की या अकाऊंटला बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक अयान मुखर्जी देखील फॉलो करतो. इतकंच नाही तर अनुराग बसु आणि संदीप रेड्डी वांगा देखील या अकाऊंटला फॉलो करतात. तर त्यांचं म्हणणं आहे की याच नावानं रणबीर कपूरचं आधीचं ट्विटर म्हणजेच X या सोशल मीडियावर त्याचं अकाऊंट आहे. 

हेही वाचा : 'पुढच्या 3 वर्षात मी हॉलिवूडमधील चित्रपटाचं दिग्दर्शन करेन'; 'या' भारतीय दिग्दर्शकाने व्यक्त केला विश्वास

दरम्यान, रणबीरच्या चाहत्याला हे जाणून घ्यायचं आहे की खरंच रणबीर कपूर हा अशा कोणत्या अकाऊंटवरून त्याची ओळख लपवत सोशल मीडियाचा वापर करतोय. तर आलियानं देखील रणबीरसाठी एक पोस्ट शेअर करत त्याचं फेक अकाऊंट असल्याची हिंट दिली होती. यासोबत कपूर कुटुंबातील आणखी एका व्यक्तीनं इन्स्टाग्रामवर खरं अकाऊंट सुरु करण्याआधी अनेक वर्षे सिक्रेट अकाऊंटचा वापर केला होता. ती दुसरी कोणी नसून बॉलिवूडची बेबो करीना कपूर आहे. तिनं खुलासा केला होता की इन्स्टाग्रावर तिच्या नावानं ऑफिशियल अकाऊंट सुरु करण्याआधी बरीच वर्षे तिनं सिक्रेट अकाऊंट सुरु केलं होतं.