Does Not Mind Paparazzi Zooming: अभिनेत्री आणि नृत्यांगणा असलेल्या शेफाली जरीवालने पापाराझींबद्दल केलेलं एक विधान चर्चेत आहे. सामान्यपणे पापाराझींबद्दल सेलिब्रिटींकडून फारश्या चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत नाहीत. त्यातही हल्ली पापाराझी सेलिब्रिटींचे खास करुन अभिनेत्रींचे कोणत्याही अँगलने फोटो काढत असल्यावरुन जोरदार टीका होताना दिसत आहे. अनेक अभिनेत्री तर हल्ली पापाराझींकडे पाठ करुन चालायलाही नकार देतात. पापाराझी आपल्या पार्शभागावर झूम करुन फोटो काढतात असा महिला सेलिब्रेटींचा आक्षेप असतो. बऱ्याच जणींनी हा उघडपणे बोलून दाखवला आहे. असं असतानाच शेफालीने मात्र आपली याला काहीच हरकत नसल्याचं म्हटलं आहे.
फोटोग्राफर्सने माझ्या पार्श्वभागावर कॅमेरा झूम करुन फोटो काढले तरी माझी काही हरकत नाही, असं शेफालीने म्हटलं आहे. आपण बॉडी पॉझिटीव्हीटीबद्दल अधिक बोललं पाहिजे असं शेफालीने आपल्या विधानामधून अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. पऱ्हास छाबराच्या 'आकरा का डाबरा' नावाच्या पॉडकास्टमध्ये शेफाली सहभागी झालेली. सेलिब्रिटींचे फोटो काढणारे पापाराझी तुझ्या शरीरावर कुठेही आणि कसंही झूम करुन फोटो काढलेलं तुला चालेल का? तसेच तुझ्या पार्श्वभागावर फोटोग्राफरने झूम केल्यास त्याला तुझी काही हरकत असेल का? असा प्रश्न शेफालीला विचारण्यात आला.
या प्रश्नाला उत्तर देताना शेफालीने, "मला काहीच हरकत नाही. मी माझ्या पार्श्वभाग सुडौल असावा म्हणून फार मेहनत घेतली आहे. मी पार्श्वभाग छान दिसावा यासाठी व्यायाम करताना विशेष मेहनत घेते. त्यामुळे मला काहीही हरकत नाही. मला आणि माझ्या फोटोंचे अँगल कव्हर करायला पराग त्यागी आहेच," असं म्हटलं. तसेच, "मी तुला एक सांगू का, पापाराझी हे कधीच अनादर करत नाहीत. लोक याला सौंदर्य दृष्टीने पाहा असं म्हणतात ना तसाच प्रकार आहे. मी शो बिझनेसमध्ये आहे तर मी अशा गोष्टींना नकार देऊन कोणाला फसवणार आहे? मी एवढी मेहनत कशासाठी घेतेय? जे आपल्याकडे आहे त्याचा अभिमान बाळगला पाहिजे," असं शेफाली म्हणाली.
एकीकडे शेफालीला अशाप्रकारे पार्श्वभागावर झूम करुन फोटो काढल्यासंदर्भात कोणतीही हरकत नसताना दुसरीकडे अनेक अभिनेत्रींनी यापूर्वी यावर आक्षेप घेतला आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूरने एका कार्यक्रमामध्ये पापाराझींना पाठमोरा फोटो देण्यास नकार दिला होता. अभिनेत्री पलक तिवारी, नायरा बॅनर्जी आणि इतरांनीही अशाप्रकारे त्यांचे मागून फोटो काढण्यावर उघडपणे आक्षेप घेतला आहे. अभिनेत्री जान्हवी कपूरने फोटोग्राफर्सला कॅमेरासमोर, 'चुकीच्या अँगलने माझे फोटो काढू नका' असं बजावलं आहे. अनेकदा आपण फोटोग्राफर्सला जीमच्या टाइट कपड्यांमध्ये माझे फोटो काढू नका असं सांगूनही ते ऐकत नाहीत, अशी तक्रार जान्हवीने केलेली.