Urfi Javed : चेहऱ्यावर ग्लो पाहिजे का.. उर्फीने असं काही सांगितलं की तुम्ही ऐकून व्हाल थक्क...

नुकताच तिने इंन्सटा स्टोरीवर प्रश्न आणि उत्तरे असं पोस्ट केलं होते.

Updated: Sep 29, 2022, 04:29 PM IST
Urfi Javed : चेहऱ्यावर ग्लो पाहिजे का.. उर्फीने असं काही सांगितलं की तुम्ही ऐकून व्हाल थक्क... title=
Do you want glow on your face Urfi Javed said something that you will be shocked to hear NZ

Urfi Javed Tips : उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. बऱ्याचदा तिला तिच्या बोल्ड अंदाजामुळे चाहत्यांची पंसती मिळते तर कधी कधी तिला तिच्या कपड्यांवरुन ट्रोल देखील केले जाते. उर्फी तिच्या अंदाजाने आता सोशल मीडियावर (Social Media) सेन्सेशन बनली आहे. (Do you want glow on your face Urfi Javed said something that you will be shocked to hear NZ)

उर्फी सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय (Active) असते. ती तिच्या चाहत्यांसोबत इंन्सटग्राम लाइव्ह (Instagram live), इंन्सटा स्टोरीसच्या (Instagram story) माध्यमातून चाहत्यांचे मनोरजंन (entertainment) करत असते. नुकताच तिने इंन्सटा स्टोरीवर प्रश्न आणि उत्तरे असं पोस्ट केलं होते. बऱ्याच चाहत्यांनी नाना प्रकारचे प्रश्न तिला विचारले. तिच्याकडून काही जणांनी टिप्स (Tips) सुद्धा मागितल्या.

Glowing Skin Tips : एका चाहत्याने तिला विचारले की तुझ्या चेहऱ्यावर इतका ग्लो (Glow) कसा? उर्फीचे उत्तर ऐकून तुम्हाला धक्का बसेल. कारण तिने तिच्या उत्तरात सांगितले की, "तुम्ही एका अशा टॉक्सीक (toxic) मुलाला डेट (Date) करा की जेणेकरुन तो तुम्हाला रडवेल. रडल्यानंतर जो चेहऱ्यावर ग्लो येईल त्याचा काही नेम नाही..." असं तिने तिच्या स्कीन टिप्स (Skin Tips) मध्ये सांगितले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आपण वांरवार टॉक्सीक लोक किंवा  टॉक्सीक रिलेशनशीपपासून लांब राहण्याचे सल्ले ऐकत आलो आहोत. पण चक्क उर्फीने टॉक्सीक मुलासोबत डेट करण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही जितके रडाल तेवढा तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येईल असं ती सांगतेय.

आणखी वाचा - Vivaah Actress : 'विवाह' चित्रपटातील छोटी बनली मोठी स्टार, आता दिसतेय इतकी बोल्ड