TMKOC : चंपकचाचांचं खरं वय तुम्हाला माहित आहे का? मुलगा जेठालालपेक्षा 'इतक्या' वर्षांनी लहान

TMKOC: सध्या चर्चा आहे ती म्हणजे तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेची. ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. त्यातून या मालिकेतील सर्वच पात्र ही लोकांच्या मनात घर करून आहेत. त्यातीलच एक पात्र म्हणजे बापूरजी यांचे. परंतु तुम्हालाही माहितीये का की चंपकचाचांची भुमिका साकारणारे अभिनेते अमित भट्ट यांचे खरे वय काय? 

गायत्री हसबनीस | Updated: Jul 26, 2023, 09:19 PM IST
TMKOC : चंपकचाचांचं खरं वय तुम्हाला माहित आहे का? मुलगा जेठालालपेक्षा 'इतक्या' वर्षांनी लहान title=
July 26, 2023 | do you know babuji from tarak mehta ka ooltah chashama real age trending news in marathi

TMKOC: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका आपल्या सर्वांचीच फार आवडती आहे. गेली 15 वर्षे ही मालिका आपलं मनोरंजन करते आहे. तुम्हाला आत्तापर्यंत या मालिकेतील सर्वच पात्र ही आपल्या परिचयाचे असतीलच. सध्या चर्चा आहे ती म्हणजे या अमित भट्ट यांची. तुम्हाला माहितीच आहे की ते या मालिकेत दिलीप जोशी यांच्या वडिलांची म्हणजे बापूजी अर्थात चंपकचाचा यांचे खरे वय ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवया राहणार नाही. मालिकेत त्यांच्या डोक्यावर आपल्याला टक्कल दिसते आहे. त्यांचे केस वयामानाप्रमाणे पिंगट पांढरे झालेले दिसत आहेत आणि सोबतच अगदी वयोवृद्धांप्रमाणे ते धोती आणि गंजीफ्रॉक घालतात तर कधी कुर्ता. त्यांच्या हातात काठीही असते आणि डोळ्यावर चष्मा. त्यामुळे ते अगदी त्यांच्याच वयाचे प्रत्यक्ष आयुष्यात असतील असे तुम्हाला वाटत असेलच. 

परंतु थांबा तुम्हाला कदाचित धक्का बसेल परंतु हा गोंधळ तुमचा मेकअपमुळे होतो आहे. वास्तवात काही ते वयोवृद्ध नाहीत. ते खूप यंग आणि हॅण्डसम दिसतात. त्यांचे पर्सनल फोटोज जरा का तुम्ही पाहिलेत तर तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे सध्या त्यांचे काही फोटोही व्हायरल होताना दिसत आहेत. सध्या त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे ज्यात ते अगदी डॅशिंग आणि रूबाबदार वाटत आहेत. त्यांच्या डोळ्यावर गोगल आहे. केस काळे आहेत. त्यांनाही एक वेगळी स्टाईल आहे आणि सोबतच त्यांनी टिपिकल वयोवृद्धांचे कपडे घातलेले नसून त्यांनी यावेळी अगदी वेस्टर्न आऊटफिट्स परिधान केलेले आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा या त्यांच्या फोटोवरून रंगली आहे. 

हेही वाचा - 'जीव घाबरा होतोय...' मणिपूरमधील हिंसाचारावर सोनाली कुलकर्णीची संतप्त प्रतिक्रिया

अमित भट्ट यांचे खरे वय हे 47 वर्षे इतके आहे. त्यातून ते या मालिकेतून 65 वर्षांच्या आजोबांची भुमिका केली आहे. त्यातून ते गेल्या 15 वर्षांपासून ही भुमिका निभावतं आहेत. त्यामुळे सध्या त्यांचे खरे वय ऐकून तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. त्यातून तुम्हाला हेही माहितीये का की दिलीप जोशी यांचेही वय प्रचंड कमी आहे. त्यातून अमित भट्ट तर दिलीप जोशी यांच्यापेक्षाही खूप लहान आहेत. 

सध्या ही मालिका वेगळ्याच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. यावेळी निर्मात्यांवर या मालिकेतील कलाकार नानाविध आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यामुळे यावेळी सोशल मीडियावर या मालिकेवरून चर्चा पिकली आहे.