सैफ-करीनामध्ये वाद? 'तो' बॉलिवूड अभिनेता ठरला कारण

 बेबो या नावानं ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. 

Updated: Oct 22, 2022, 03:15 PM IST
सैफ-करीनामध्ये वाद? 'तो' बॉलिवूड अभिनेता ठरला कारण title=
Dispute between Saif Kareena Because he became a Bollywood actor nz

मुंबई : बेबो या नावानं ओळखली जाणारी अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) गेल्या कित्येक वर्षांपासून चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. अभिनेत्री करीना कपूर केवळ तिच्या चित्रपटांमुळेच नाही तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली आहे. सध्या तिची गणना टॉप बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये केली जाते. कभी खूशी कभी गम (Kabhi Khushi Kabhie Gham), जब वी मेट (Jab We Met), 3 idiots, वीरे दी वेडींग (Veere Di Wedding), बॉडीगार्ड (Bodyguard) आणि हिरोईन (Heroine) यासारख्या सूपरहिट चित्रपटांतून दमदार भूमिका साकारुन तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 

हे ही वाचा - नुकतीच आई होणारी आलिया 'या' आजाराची शिकार

 

 

तुम्हाला आठवत असेलच काही वर्षांपूर्वी करीना कपूर आणि अर्जुन कपूरचा ‘की एंड का’ (Ki & Ka) चित्रपट आला होता. या चित्रपटात करीना कपूर आणि अर्जुन कपूर जोडपे म्हणून दाखवण्यात आले होते या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगलेच प्रेम मिळाले. त्या चित्रपटात अर्जुन कपूरला (Arjun Kapoor) घरातील सगळी कामं करताना दाखवले होते तर उलट करीना कपूर ऑफिसची कामं करताना दाखवलं होतं. या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. 

करीना कपूर आणि अर्जुन कपूर हे दोघे या चित्रपटाच्या प्रमोशन करिता अनेक माध्यमांच्या संपर्कात आले. अशाच एका माध्यमाला मुलाखत देताना रिपोर्टरने करीना कपूरला विचारले, वास्तविक तिला तिच्या ऑनस्क्रीन पती आणि ऑफस्क्रीन पतीबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना करीना म्हणाली की, कधीकधी मला वाटते की मी सैफ अली खानला (Saif Ali Khan) सोडून अर्जुन कपूरसोबत लग्न करावे.  खरंतर तिनं हे विनोदी रीतीने सांगितलं. अर्जुन कपूरच्या अभिनयाचे कौतुक करताना करीना कपूर असे सांगत होती.

हे ही वाचा - Salman Khan : सलमान खानला 'या' आजाराने गाठलं

 

 

तो चित्रपट चांगलाच लोकांच्या पंसतीस ठरला होता. अनेकांनी त्यांच्या अभिनयाचे कौतूक केले. त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही दमदार कमाई केली होती.