टायगरसोबतच्या नात्यावर दिशाचं धक्कादायक स्पष्टीकरण

दिशा म्हणते...

Updated: Feb 6, 2020, 07:10 PM IST
टायगरसोबतच्या नात्यावर दिशाचं धक्कादायक स्पष्टीकरण title=

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटनी यांच्या नात्याच्या चर्चा सध्या वाऱ्यासारख्या पसरत आहे. तर चाहत्यांना देखील हे जोडपं फार आवडत आहे. हे दोघे अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट होतात. हॉटेलमध्ये, शॉपिंगसाठी किंवा कोणत्याही पार्टीमध्ये हे दोघं एकत्र हजेरी लावतात. नुकताच दिशाला एका मुलाखतीत टायगर आणि तिच्या रिलेशनशिपविषयी प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा तिला दिलेल्या उत्तराने सर्वांना धक्काच बसला. 

दिशा म्हणाली, 'कोणतं आणि कसलं रिलेशनशिप...' असं धक्कादायक उत्तर दिशाने दिल्यामुळे ते दोघे आता एकत्र नसल्याचे समोर येत आहे. तर काही दिवसांपूर्वी अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पटानी या दोघांनी लग्न करण्याची इच्छा वडील जॅकी श्रॉफने व्यक्त केली. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जॅकी श्रॉफला टायगरच्या लग्ना संबंधित प्रश्न विचारण्यात आला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Against his strongest enemy, His greatest battle, Up against a nation, RONNIE is back!Baaghi3 trailer out on 6th Feb, Thursday. #sajidnadiadwala . . @shraddhakapoor @riteishd @khan_ahmedasas @wardakhannadiadwala @foxstarhindi @nadiadwalagrandson

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on

टायगर २५ वर्षांच्या असताना त्याच्या आयुष्यात एक खास व्यक्ति आली आणि आता ते दोघे फार चांगले मित्र-मैत्रिण असल्याचे जॅकी श्रॉफ यांनी सांगितले. आता प्रतिक्षा आहे ती म्हणजे टायगर-दिशा यांच्या मैत्रीवर रूपांतर नात्यात कधी होईल. असं स्पष्टीकरण जॉकी श्रॉफने दिलं होतं. 

दरम्यान, टायगर लवकरच 'बागी ३' मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर त्यांच्यासोबत अभिनेत्री श्रद्धा कपूर देखील मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. त्याचप्रमाणे दिशा अभिनेता सलमान खानसोबत 'दबंग ३' मध्ये झळकणार आहे