तारक मेहता.....दिशा वकानी हिच राहाणार दयाबेन

मालिकेत दिशा वकानीची जागा कोणीही घेवू शकत नाही.

Updated: Jan 26, 2019, 06:07 PM IST
तारक मेहता.....दिशा वकानी हिच राहाणार दयाबेन title=

मुंबई: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही मालिका छोट्या पडद्यावर फार गाजत आहे. मालिकेमधील दयाबेनने चाहत्यांच्या मनात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले.पण गेल्या काही दिवसांपासून हे पात्र फार चर्चेत आहे. दिशा वकानी म्हणजे आपल्या सर्वांचे मनोरंजन करणारी दयाबेन. दयाबेन मालिका सोडून जाणार अशा चर्चांना उधान आले होते. पण या चर्चांना कदाचीत पूर्णविराम लागू शकतो. मालिकेचे निर्माते आतिश कुमार यांनी याबाबतीत खुलासा करत मालिकेत दिशा वकानीची जागा कोणीही घेवू शकत नाही आणि मालिकेत त्यांची भूमिका संपवण्याचा कोणताही विचार झाला नाही. 

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत निर्माते आतिश कुमार म्हणाले, 'करार संपलेला नाही. दया भाभी हे पात्र मालिकेत कायम आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाला घेतले नाही. जेव्हा त्यांना वाटेल मालिकेत परत यावे, त्यावेळी बघू. जर दोघांसाठी फायदेशीर असेल तर एकसाथ परत काम करु.'

या बातमीला दुजोरा देताना परआशित म्हणाले 'या बातमीची सत्यता सांगता येत नाही.  मला अंतिम निर्णयाबद्दल माहित नाही. माझी टीम तिच्याशी बोलत आहे'.

दया बेन छोट्या पडद्यावर सध्या दिसत नाही. प्रसूती नंतर दिशा मालिकेपासून लांब आहे. मुलीच्या जन्मानंतर  दिशा मालिकेत परतली परंतू फक्त काही दिवसांकरता. सध्या ती संपूर्णवेळ तिच्या कुटुंबासोबत घालवत आहे. दिशाचे मालिका सोडण्याचे कारण स्टारकास्टला विचारल्यास त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला.