'तारक मेहता..' मध्ये पुन्हा येण्यासाठी दयाबेनची मोठी मागणी

एका एपिसोडसाठी आकारणार एवढे रुपये 

'तारक मेहता..' मध्ये पुन्हा येण्यासाठी दयाबेनची मोठी मागणी  title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत मोठ्या ब्रेकवर दिशा वकानी गेली होती. काही दिवसांपूर्वी अशी चर्चा होती की, आता दिशा या शोमध्ये पुन्हा दिसणार नाही. मात्र आता हाती आलेल्या माहितीनुसार ती पुन्हा शोमध्ये दिसणार आहे. पण शोमध्ये येण्यासाठी दिशाने एक मोठी मागणी दिग्दर्शक आणि निर्मात्यांसमोर ठेवली आहे.  

दिशा आपल्या मॅटरनिटीकरता जाण्या अगोदर दिशा पहिल्या एपिसोडकरता 1 लाख 25 हजार चार्ज करत होती. पण आता मॅटरनिटीच्या सुट्टीवरून आल्यावर दिशाने 1 लाख 50 हजारांची मागणी केली आहे. तसेच तिने अजून एक गोष्ट सांगितली आहे की, ती कोणत्याही परिस्थिती संध्याकाळी 6 च्या पुढे काम करणार नाही. 

दिशा दुपारी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत शिफ्ट करणार असल्याचं सांगितलं. एवढंच नाही तर दिशा महिन्यातून फक्त 15 दिवस काम करणार इतर अॅक्टर मात्र 22 ते 25 दिवस काम करतात. वाहिनीने देखील तिच्या सर्व अटी मान्य केल्या आहेत. दयाबेन ही या मालिकेतील सर्वात लोकप्रिय कॅरेक्टर आहे यामुळे तिला इतर कोणत्याही कॅरेक्टरशी रिप्लेस करू शकत नाही. दिशा वकानी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये 'तारक मेहता..' मध्ये दिसली होती. त्यानंतर दिशा मॅटरनिटी सुट्टीवर गेली होती. तिच्या नसण्यामुळे स्टोरीत अनेक बदल करण्यात आले होते. मात्र आता दिशा परत येणार आहे.