दिशाच्या जिममधील या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा...

बागी २ सिनेमाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करणारी अभिनेत्री दिशा पटानी सध्या चर्चेत आहे.

Updated: Apr 13, 2018, 12:31 PM IST
दिशाच्या जिममधील या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा... title=

मुंबई : बागी २ सिनेमाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई करणारी अभिनेत्री दिशा पटानी सध्या चर्चेत आहे. अलिकडेच दिशाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. काही वेळातच या व्हिडिओला 2,83,184 लाईक्स मिळाले असून हा व्हिडिओ लोकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओत बिग बॉसची एक्स कन्टेस्टेंट वीजे बानी देखील आहे. मिनिटाभराच्या या व्हिडिओत दिशा पटानी आणि वीजे बानी जिममध्ये घाम गाळताना दिसत आहेत. ज्यात दोघींही कमाल दिसत आहेत. यात दोघींनीही प्युमाची वर्कआऊट एक्सेसरीज घातली आहे.

दिशाने शेअर केला व्हिडिओ...

हा व्हिडिओ शेअर करताना दिशाने लिहिले की, मी प्रत्येक पावलासोबत स्वतःला परफेक्ट फोर्ममध्ये पाहते. आज आणि प्रत्येक दिवशी. Get En Pointe. #DoYou…

 

I work to find that perfect form with every move. Today, every day. Get En Pointe. #DoYou

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

नव्या सिनेमासाठी दिशाची खास तयारी

बागी २ नंतर दिशा पुढच्या सिनेमासाठी सज्ज झाली आहे. त्यात ती राजकुमारी संघमित्राची भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा जुलैमध्ये प्रदर्शित होईल. या सिनेमासाठी दिशा तलवारबाजी शिकत आहे. त्याचबरोबर या सिनेमात तमिळ अभिनेता जयम रवि आणि आर्या हे कलाकारही प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा तमिळ, तेलगु आणि हिंदी या तीन भाषांमध्ये प्रदर्शित होईल.