'तारक मेहता...' मालिकेत दयाबेनची एन्ट्री; काय असेल ट्विस्ट?

 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. 

Updated: Apr 12, 2021, 01:52 PM IST
'तारक मेहता...' मालिकेत दयाबेनची एन्ट्री; काय असेल ट्विस्ट? title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. ही मालिका टप्पूसेनेमुळे लहान मुलांना तर गोकुळ धाम सोसायटीतील एकीमुळे मोठयांना आवडते. आता लहान मुलांसाठी मालिकेचं एनिमेटेड व्हर्जन सुरू करण्यात आलं आहे. या एनिमेटेड व्हर्जनमध्ये दयाबेन, जेठालाल, टप्पू, बापूजी, पोपटलाल आणि शोच्या अन्य कलाकारांचे देखील एनिमेटेड  व्हर्जनमध्ये दिसणार आहे. त्यामुळे याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

मलिकेचे निर्माते असित मोदी यांनी दयाबेन एनिमेटेड व्हर्जनमध्ये दिसेल असं सांगितलं आहे. 'ओरिजिनल शोमध्ये दयाबेन नसली तरी एनिमेटेड व्हर्जनच्या माध्यमातून दयाबेन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. ' निर्मात्यांच्या या निर्णयामुळे आचा मालिकेच्या प्रेक्षकांना एनिमेटेड दयाबेनला पाहाता येणार आहे. सध्या तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेच्या एनिमेटेड व्हर्जनची चर्चा जोरदार रंगत आहे. 

असित मोदी पुढे म्हणाले, 'मझ्या शोला 13 वर्ष पूर्ण झाली आहेत. मला लहान मुलासांठी मालिकेचं एनिमेटेड व्हर्जन लाँच करायचं होतं. आता माझं स्वप्न पूर्ण होत आहे. सोनी चॅनेलच्या एसोसिएशनच्या माध्यमातून माझं आणि टीमचं हे स्वप्न पूर्ण होत आहे.' असं देखील मालिकेच्या निर्मात्यांनी सांगितलं. 

2008 पासून सुरु आहे मालिका
'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही सोनी सब चॅनलवर चालणारी लोकप्रिय मालिका आहे.   जुलै 2008 मध्ये प्रथमच प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि तेव्हापासून टीव्हीवर  सुरु आहे.  ही मालिका 'दुनिया ने ऊंधा चश्मा' या साप्ताहिक कॉलमवर आधारित आहे.