RRR wins Best Foreign Language Film Award: 'आरआरआर' खतरनाक! राजामौलींचा चित्रपट ठरला 'जगात भारी'

RRR win Best Foreign Film Award: अगदी आजही जपानमधील चित्रपटगृहामध्ये हाऊसफूल असलेल्या 'आरआरआर'ने एका आठवड्यात पटकावलेला हा दुसरा मानाचा पुरस्कार ठरलाय

Updated: Jan 16, 2023, 09:02 AM IST
RRR wins Best Foreign Language Film Award: 'आरआरआर' खतरनाक! राजामौलींचा चित्रपट ठरला 'जगात भारी' title=
RRR wins Best Foreign Language Film Award

RRR wins Best Foreign Language Film Award: दिग्दर्शक एसएस राजामौली (Director SS Rajamouli) यांच्या 'आरआरआर' (RRR) यांच्या चित्रपटाने पुन्हा एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने 'क्रिटिक्स चॉइस' पुरस्कार सोहळ्यात 'परदेशी भाषेतील सर्वोत्तम चित्रपट' (Best Foreign Language Film at the Critics Choice Awards) हा पुरस्कार पटकावला आहे. लॉस एंजलिसमधील फेअरमॉण्ट सेन्चुरी प्लाझा येथे पार पडलेल्या सोहळ्यामध्ये हा पुरस्कार प्रदार करण्यात आला. एसएस राजामौली आणि त्यांचा मुलगा एसएस कार्तिकेय यांनी मंचावर जाऊन हा पुरस्कार स्वीकारला. मागील आठवड्यातच या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याने 'गोल्डन ग्लोब्स 2023' पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्तम गाण्याचा पुरस्कार पटकावला होता.

अमेरिकेतील कॅलिफॉर्नियामध्ये बुधवारी पार पडलेल्या ८० व्या 'गोल्डन ग्लोब्स 2023' पुरस्कार सोहळ्यामध्ये (golden globes 2023 award) एसएस राजामौलींच्या 'आरआरआर' (RRR) चित्रपटातील 'नाटू नाटू' (Natu Natu) गाण्याला 'बेस्ट ओरिजनल साँग-मोशन पिक्चर' कॅटेगरीमधील पुरस्कार पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. या सोहळ्याला राजामौलींबरोबरच एनटीआर आणि राम चरण हे त्यांच्या कुटुंबियांसहीत उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्यानंतर 'आरआरआर'ने परदेशी भाषेतील सर्वोत्तम चित्रपट हा पुरस्कार पटकावत आपल्या शिरपेचात मानाचा आणखीन एक तुरा खोवला आहे. 

क्रिटिक्स चॉइस पुरस्काराच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन "आरआरआर चित्रपटाचे कलाकार आणि टीमचं अभिनंदन. त्यांनी क्रिटिक्स चॉइस पुरस्कार सोहळ्यात परदेशी भाषेतील सर्वोत्तम चित्रपट हा पुरस्कार जिंकला आहे," असं ट्वीट करत घोषणा करण्यात आली.

आरआरआर हा मूळचा चित्रपट तेलगु भाषेतील चित्रपट असून दोन स्वातंत्र्य सैनिकांची कथा यात सांगण्यात आली आहे. हा चित्रपट 550 कोटी रुपये खर्च करुन बनवला होता. या चित्रपटाने जगभरामध्ये 1200 कोटींचा व्यवसाय केला. आजही जपानमध्ये हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखवला जात आहे.

ज्युनियर एनटीआर, राम चरण यांच्याबरोबरच चित्रपटामध्ये आलिया भट्ट, अजय देवगन यासारख्या कलाकारांनीही भूमिका बजावल्या आहेत.