'बरेच मुलं वारसा घेतात पण याने..', दिग्दर्शकाची पोस्ट वाचून अभिनय भावुक

Abhinay Berde : अभिनय बेरडेसाठी नाटकाच्या दिग्दर्शकानं शेअर केली भावुक पोस्ट... लक्ष्मीकांत बेर्डेंचा उल्लेख करत म्हणाला...

दिक्षा पाटील | Updated: May 6, 2024, 06:45 PM IST
'बरेच मुलं वारसा घेतात पण याने..', दिग्दर्शकाची पोस्ट वाचून अभिनय भावुक title=
(Photo Credit : Social Media)

Abhinay Berde : लोकप्रिय दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा आणि अभिनेता अभिनय बेर्डेनं यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण करताच सगळ्यांची मने जिंकली. 'ती सध्या काय करते' या चित्रपटातून अभिनयनं लोकप्रियता मिळवली. चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनय आता नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. त्यानिमित्तानं नाटकाचा लेखक आणि दिग्दर्शक क्षितीज पटवर्धननं त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. 

क्षितीजनं ही पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये क्षितीजनं अभिनचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत अभिनयच्या मागे पाहिलं तर लक्ष्मीकांत बेर्डे यांचा फोटो दिसत आहे. तर हा फोटो शेअर करत क्षितीजनं कॅप्शन दिलं की "मागे लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा फोटो पाहिला आणि पुढे उभा अभिनय, फोटो काढताना असं वाटलं की बरीच मुलं वारसा घेतात, यानं वसा घेतलाय. तू जिथे कुठे जाशील तिथे त्यांचा आशीर्वाद असाच तुझ्या पाठीशी असेल! अतिशय गुणी, मेहनती, समजूतदार आणि उत्स्फूर्त अभिनेता. आज्जीबाई जोरात पाहून प्रेक्षक आपल्याच मुलाचं कौतुक करावं तसं अभिनयचं कौतुक करतात. ही त्याची कमाई आणि त्याच्या आईवडलांची पुण्याई. उद्या बोरिवली दुपार. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

क्षितीजची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. तर ही पोस्ट पाहताचा अभिनयनं देखील त्यावर कमेंट केली आहे. 'सर, माझ्याकडे शब्द नाहीयेत, पण तुम्ही दिलेल्या संधी बद्दल तुमचे जितके आभार मानावे तितके कमी आहेत, आपल्या नाटकानं मला खूप गोष्टी दिल्यात अभिनेता म्हणून पण आणि एक माणूस म्हणून पण, माझ्या वर हा विश्वास दाखवण्या बद्दल तुमचे खर्च खूप आभार आणि खूप खूप खूप खूप खूप जास्त प्रेम,' असं अभिनय म्हणाला. 

हेही वाचा : दशक होत आला तरी एक हिट नाही, तरीही कंगना म्हणते- 'अमिताभ बच्चननंतर मीच!'

दरम्यान, क्षितीजची पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर विविध कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'वा खूप छान शब्दात लिहीले आहे. मी तर म्हणेन आमच्या मनातलं तुम्ही लिहीले आहे. All the best.' त्याशिवाय अनेक कलाकारांनी देखील त्यावर प्रतिक्रिया देत अभिनयला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनयच्या कामाविषयी बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच त्याचा 'बॉईज 4' हा चित्रपट प्रदर्शित झाला.