मुंबई : संजय गुप्ता दिग्दर्शित 'मुंबई सागा' (Mumbai Saga) चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या नव्या पोस्टरमधून अभिनेता जॉन अब्राहमचा (John Abraham) लूक रिलीज करण्यात आलाय. पोस्टरमध्ये जॉन एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळतोय. कपाळावर टिळा, त्याची रोखलेली नजर त्याच्या भूमिकेबाबत अधिक उत्सुकता निर्माण करतायेत. सोशल मीडियावर जॉनच्या या लूकची चांगलीच चर्चा असून पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होतंय. या पोस्टरनंतर ट्विटरवर प्रेक्षकांकडून जॉन आणि इमरान हाशमीच्या एकत्रित पोस्टरची मागणी होतेय.
'मुंबई सागा'मधून दिग्दर्शक संजय गुप्ता, १९८०-९०च्या दशकात मुंबईत झालेल्या गँगवॉरची कहाणी मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. 'मुंबई सागा'मध्ये जॉन अब्राहम, इमरान हाशमीशिवाय इतरही अनेक मोठे कलाकार भूमिका साकारणार आहेत. जॅकी श्रॉफ, सुनिल शेट्टी, प्रतिक बब्बर, गुलशन ग्रोवर, रोनित रॉय आणि अमोल गुप्ते हे कलाकार रुपेरी पडद्यावर एकत्रित पाहायला मिळणार आहेत.
'मुंबई सागा'आधी संजय गुप्ता यांनी हृतिक रोशन आणि यामी गौतम स्टारर 'काबिल' चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. संजय गुप्ता यांना गँगस्टरच्या चित्रपटांमध्ये मास्टरचं मानलं जातं. संजय गुप्ता यांनी 'कांटे', 'शूटआऊट ऍट वडाळा', 'शूटआऊट ऍट लोखंडवाला' या चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय.
'मुंबई सागा' १९ जून २०२० रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
One of my favourite moments from MUMBAI SAGA.
And of course Mr. Abraham like never before. pic.twitter.com/ooKz6wvt1l— Sanjay Gupta (@_SanjayGupta) January 13, 2020