'ही रात्र अशी असेल...', सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक असं का म्हणाला?

Oscars 2023 च्या यादीत गुजरातचा सिनेमा, दिग्दर्शक ट्विट करत म्हणतो, 'ही रात्र अशी असेल...'  

Updated: Sep 21, 2022, 08:32 AM IST
'ही रात्र अशी असेल...', सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक असं का म्हणाला? title=

मुंबई : प्रत्येक कलाकाराला अवॉर्ड शोची (award show) प्रतीक्षा असेत. कारण या सोहळ्यात कलाकारांना त्यांच्या कामाची त्यांना पोचपावती मिळणार असते. कलाकारांसाठी Oscar हा अवॉर्ड सर्वात मानाचा असतो. Oscars 2023 साठी सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपट (International feature films) श्रेणीसाठी भारतातील 'छेल्लो शो' या सिनेमाला नामांकन मिळाले आहे. पान नलिन लिखीत आणि दिग्दर्शित 'छेल्लो शो' (chhello show) गुजराती सिनेमा आहे. सिनेमाची संपूर्ण कथा एका खेड्यातील मुलाच्या आयुष्याभोवती फिरताना दिसत आहे. 

110 मिनिटांच्या 'छेल्लो शो' सिनेमाला ऑस्करच्या यादीत नामांकन मिळाल्यामुळे सर्व सिनेमा विश्लेषकांना (Cinema analysts) धक्का बसला आहे. कारण 'आरआरआर'  (RRR) किंवा 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) सिनेमाला  ऑस्करच्या यादीत नामांकन मिळेल अशी दाट शक्यता होती. पण तसं झालं नाही. आता फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने 20 सप्टेंबर रोजी ऑस्कर 2023 साठी भारताकडून 'छोल्लो शो' सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. 

'छेल्लो शो'  सिनेमाला ऑस्करच्या यादीत नाव मिळाल्यानंतर पान नलिन (Nalin Pan) यांनी ट्विटरच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे. ट्विट करत ते म्हणाले, 'ही रात्र कशी असेल... हे स्वप्नासारखे आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया आणि FFI ज्युरी सदस्यांचे आभार. 'चेल्लो शो'वर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद...'

सध्या पान नलिन यांचं ट्विट तुफान व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, अनेकांनी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या आहेत. या सिनेमाचा प्रीमियर (Movie premiere) 10 जून 2021 रोजी 20 व्या ट्रिबेका चित्रपट महोत्सवात झाला. या चित्रपट महोत्सवात जाणारा हा पहिला गुजराती सिनेमा होता.