प्रसिद्ध दिग्दर्शकाने उचललं टोकाचं पाऊल, बऱ्याच दिवसांपासून पत्नीसोबत होता वाद!

 वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. 

Updated: Oct 5, 2022, 11:52 PM IST
प्रसिद्ध दिग्दर्शकाने उचललं टोकाचं पाऊल, बऱ्याच दिवसांपासून पत्नीसोबत होता वाद! title=

मुंबई : तामिळ चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि टीव्ही अभिनेता लोकेश राजेंद्रन यांनी आत्महत्या केली आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. लोकेशने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि तो इंडस्ट्रीचा चमकणारा चेहरा बनला. ही बातमी समोर येताच त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लोकेशचा त्याच्या पत्नीसोबत अनेक दिवसांपासून वाद सुरू होता.

वृत्तानुसार, लोकेश विवाहित होता आणि त्याला दोन मुले आहेत. लोकेशच्या वडिलांनी सांगितलं की, 'मला एक महिन्यापूर्वी समजले की, लोकेश आणि त्याच्या पत्नीमध्ये काही वाद सुरू होते. चार दिवसांपूर्वी पत्नीकडून घटस्फोटाची कायदेशीर नोटीस आली होती. या सर्व गोष्टींमुळे तो खूप अस्वस्थ झाला होता.

लोकेशने या कारणामुळे स्वत:ला संपवलं
लोकेशचे वडील पुढे म्हणाले, 'मी शुक्रवारी त्याला शेवटचं पाहिलं. त्याने वडिलांना सांगितलं की, त्याला काही पैशांची गरज आहे आणि मी ते दिले. इतकंच नाही तर लोकेश म्हणाला होता की तो संपादकाच्या खोलीत काम सुरू करणार आहे. तमिळ टीव्हीवर येणाऱ्या 'जी बूम पा' आणि 'मर्मदेसम' सारख्या मालिकांच्या आधारे लोकेश राजेंद्रन यांनी 90 च्या दशकात खास ओळख निर्माण केली होती.

या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितलं की, 'कौटुंबिक समस्यांमुळे लोकेशने रोज दारू पिण्यास सुरुवात केली होती आणि अनेकदा तो चेन्नई मुफसिल बस टर्मिनसवर झोपताना दिसत होता.' एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 'मंगळवारी बस टर्मिनसवर काही लोकांनी तो अस्वस्थ असल्याचं पाहिलं. त्यातल्याच काहींनी रुग्णवाहिकेसाठी 108 वर फोन केला आणि पोलिसांना याची माहिती दिली.