दीपिकानं दिला जुळ्या मुलांना जन्म? पतीची पहिली प्रतिक्रिया...

Shoaib Ibrahim On Dipika Kakar Delivery:  दीपिकानं जुळ्या मुलांना जन्म दिल्याच्या बातम्यांवर चर्चा सुर असताना आता तिचा पती शोएब इब्राहिमनं सोशल मीडियावर एक व्लॉग शेअर करत या प्रकरणी माहिती दिली आहे. शोएबनं दिलेल्या या माहितीनुसार या सगळ्या अफवा असल्याचे कळले आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 9, 2023, 04:08 PM IST
दीपिकानं दिला जुळ्या मुलांना जन्म? पतीची पहिली प्रतिक्रिया... title=
(Photo Crdit : Dipika Kakar Instagram)

Shoaib Ibrahim On Dipika Kakar Delivery: छोट्या पडद्यावरील 'ससुराल सिमर का' ही मालिका चांगलीच लोकप्रिय होती. या मालिकेतून अभिनेत्री दीपिका कक्कड आणि अभिनेता त्याचसोबत दीपिकाचा पती शोएब इब्राहिम यांना लोकप्रियता मिळाली. या मालिकेनंतर आता ते दोघं त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दीपिका लवकरच आई होणार आहे. दरम्यान, सध्या अशा बातम्या समोर आल्या आहेत की दीपिकानं जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. या बातमीवर आता शोएबनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. 

दीपिका कक्कड ही लग्नाच्या 5 वर्षांनंतर आई होणार आहे. दरम्यान, सतत तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दीपिकानं मुलांना हातात धरलं आहे. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होत असताना आता चर्चा सुरु झाली आहे की दीपिकाची डिलिव्हरी झाली आहे. इतकंच काय तर दीपिका ही जुळ्या मुलांची आई होती. हे व्हायरल होणारे फोटो पाहता अनेकांनी शोएब आणि त्याच्या कुटुंबाला त्यांच्या घरात आलेल्या लहाणग्या पाहुण्यांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या सगळ्या चर्चांवर शोएबनं त्याची प्रतिक्रिया मांडली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

शोएब इब्राहिम हा व्लॉगिंगही करतो आणि त्याच्या खासगी आयुष्यातील काही अपडेट्स देत असतो. त्यानं नुकत्याच शेअर केलेल्या व्लॉगमध्ये दीपिकाच्या डिलिव्हरी विषयी सुरु असलेल्या अफवांवर शोएबनं त्याची प्रतिक्रिया दिली आहे. "बऱ्याच लोकांचे मेसेज आले आहेत की आम्हाला दोघांना मुलं झाली आहेत. कोणी बोलतं की आम्हाला जुळी मुलं झाली आहेत. तर कोणी बोलत की मुलगा झाला आहे. आता पर्यंत असं काही झालेलं नाही. आतापर्यंत असं काही झालेलं नाही. आता जे पण आहे ते अजून बाहेर पडलेलं नाही",  असं शोएब म्हणाला. 

हेही वाचा : Jackie Shroff च्या पत्नीला 58 लाखांचा चुना, वाचा काय आहे प्रकरण

शोएब इब्राहिमनं दीपिका कक्कडनं बाळाला जन्म दिल्याच्या या फक्त अफवा आहेत असं म्हटलं आहे. तर त्यावेळी दीपिकानं तिचं बेबी बंप दाखवत तिच्या चाहत्यांना पुरावा दिला आहे. यासोबतच शोएबनं खुलासा केला ही दीपिकाची लवकरट डिलिव्हरी होऊ शकते. डॉक्टरांनी जुलाईच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात डिलीव्हरीची तारीख असेल असं सांगितलं आहे. दीपिकानं तिच्या चाहत्यांना प्रार्थना केली आहे की जेव्हा ते दोघं त्यांच्या बाळाविषयी सांगतील तेव्हाच त्या बातमीवर विश्वास ठेवा. नाही तर अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका. कारण हे सगळ्या अफवा पसरवण्याच येत आहेत.