अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा अभिनेते दिलीप कुमार यांच्याबद्दल वादग्रस्त लेख

दिलीपकुमार हे भारताचे एक मोठे स्टार होते

Updated: Jul 13, 2021, 09:25 PM IST
अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा अभिनेते दिलीप कुमार यांच्याबद्दल वादग्रस्त लेख title=

मुंबई : बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेते दिलीप कुमार यांचं गेल्या आठवड्यात वयाच्या 98व्या वर्षी निधन झालं. अशा परिस्थितीत बॉलिवूडचे अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. खुद्द नसीरुद्दीन हे दिलीप साहब यांचे मोठे चाहते आहेत. पण जेव्हा भारतीय सिनेमाचा विचार केला गेला तर त्यांचं मत काहीसं वेगळे आणि स्पष्ट आहे. अलीकडेच त्यांनी एक लेख लिहिताना याचा उल्लेख केला आहे.

एका वृत्तासाठी लिहिलेल्या लेखात नसीर म्हणाले की, दिलीपकुमार हे भारताचे एक मोठे स्टार होते, मात्र हिंदी सिनेमा किंवा नवीन कलाकारांच्या प्रचारात त्यांनी फारसं योगदान दिलं नाही. नसीरुद्दीन यांनी या लेखात लिहिलं आहे की, दिलीप कुमार यांचा अभिनय 'नाट्यमय होता, त्यांनी नियमांचे पालन केलं नाही. पुढे त्यांनी आपल्या लेखात असंही लिहिलं आहे की, दिलीपकुमार यांनी आपल्या अदाकारीद्वारे भारतीय चित्रपटांमध्ये एक प्रतिमान स्थापन केला आहे. ज्याची अनेक कलाकारांनी नक्कल करण्याचा प्रयत्न केला पण त्यांची नक्कल पकडली जायची.

दिलीपकुमार यांच्यासाठी लिहिताना नसीरुद्दीन शाह यांनी पुढे लिहिलं आहे की, बऱ्याच चित्रपटांमध्ये इतकं काम करूनही त्यांनी सिनेमात कोणतंही मोठं योगदान दिलेलं नाही. "जिथे आपण पोहोचलो तिथे अभिनयाशिवाय इतर कोणतंही काम त्यांनी केलं नाही, उलट ते मनापासून जवळ असलेल्या सामाजिक कार्यात अधिक गुंतले होते."

दिलीपकुमारचा कोणालाही फायदा झाला नाही
नसीरुद्दीन शाह यांनी लिहिल आहे की, दिलीप कुमार यांनी त्यांच्या आयुष्यात फक्त एकच चित्रपट तयार केला होता. ज्यामध्ये त्यांनी कधीही दिग्दर्शन केलं नाही. त्यांनी आपला अनुभव पुढच्या पिढीसाठी कधीच सोडला नाही. 1970 मध्ये त्यांच्या काही चित्रपटांनंतर त्यांनी त्याच्या आधी आलेल्या कलाकारांसाठी काही खास सोडलं नाही. त्यांनी आपल्या स्टारडमचा काही खास उपयोग केला नाही. आपण चित्रपटांसाठी बरीच कामे करू शकू अशी त्यांची इच्छा होती परंतु त्यांनी असं काहीही केलं नाही.

नसीरुद्दीन शाहचा हा लेख आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नसीरुद्दीन गेल्या अनेक दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे रूग्णालयात दाखल होता. त्यानंतर आता ते परत आपल्या घरी परतले आहेत. नसीरुद्दीन शाह लवकरच त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टसाठी आपल्याला भेटणार आहेत