मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी गेल्या आठवड्यात जगाचा अखेरचा निरोप घेतला. पण त्यांच्या आठवणी आजही आपल्यात कायम आहेत. त्यांनी मुंबईच्या हिंदूजा रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक निधनामुळे संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला. अशात अनेक दिग्गज व्यक्ती दिलीप कुमार संबंधित आठवणी शेअर करत आहेत. आता प्रसिद्ध पटकथा लेखक आणि दिग्दर्शक रूमी झाफरी दिलीप कुमारसोबत यांच्या पहिल्या भेटीचे किस्से सांगितले आहेत.
रूमी झाफरी पहिल्यांदाच प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेता जॉनी वॉकरबरोबर दिलीप कुमार यांना भेटायला गेले होते. या बैठकीत दिलीपकुमार यांनी लग्नात हजेरी लावण्यासाठी जबरदस्त फी घेणाऱ्या कलाकारांबद्दल आश्चर्य व्यक्त केले. शिवाय ही गोष्ट चुकीची असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. एका मुलाखतीत रूमी झाफरी यांनी संबंधित किस्सा सांगितला.
रूमी झाफरी म्हणाले , 'जॉनी वॉकर यांच्यासोबत मी दिलीप कुमार यांनी भेटण्यासाठी गेलो. मला लक्षात आहे, ते आले माझ्यासमोर खूर्चीत बसले.कलाकारांनी लग्नात येण्यासाठी भरमसाठ फी घेतल्याबद्दल अफवा पसरल्या आहेत. चित्रपटसृष्टीची प्रतिमा डागाळण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत.' पण पण दिलीप कुमार आश्चर्यचकित झाले जेव्हा मी नाही म्हणालो कलाकार लग्न संमारंभात उपस्थित राहाण्यासाठी पैसे घेतात.
रूमी झाफरी पुढे म्हणाले, 'दिलीप कुमार मला म्हणाले, मी लग्न समारंभात फुकट जातो. नवीन जोडप्याला आशिर्वाद देतो. कोणत्याही दुकानात गेले तरी दिलीप कुमार पैसे घ्यायचे नाहीत. त्या व्यक्तीचा व्यवसाय वाढावा हाच त्यांचा हेतू असायचा.' दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांचे अनेक किस्से आज जिवंत आहेत.