मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं आज सकाळी 7.30 वाजता निधन झालंय. ते 98 वर्षाचे होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने गेल्या महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं..पण आज बॉलिवूडच्या ट्रॅजेडी किंगने सगळ्यांचा निरोप घेतलाये. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडचं मोठं नुकसान झालंय. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने 'खरा हिरो' असं ट्विट करत दिलीप कुमार यांच्या जाण्याने दु:ख झाल्याचं म्हटलंय.
To the world many others may be heroes. To us actors, he was The Hero. #DilipKumar Sir has taken an entire era of Indian cinema away with him.
My thoughts and prayers are with his family. Om Shanti pic.twitter.com/dVwV7CUfxh— Akshay Kumar (@akshaykumar) July 7, 2021
अजय देवगणने दिलीप कुमार यांचासोबतचा फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिलीये, नेहमीच ते स्मरणात राहतील असं ट्विटमध्ये म्हटलंय.
Shared many moments with the legend...some very personal, some on stage. Yet, nothing really prepared me for his passing away. An institution, a timeless actor. Heartbroken.
Deepest condolences to Sairaj#DilipKumar pic.twitter.com/Il8qaMOOhf— Ajay Devgn (@ajaydevgn) July 7, 2021
बॉलिवूड अभिनेता मनोज जोशी यांनी दिलीप कुमार यांचं एक सुंदर पेटींग शेअर केलंय.
Saddened by the demise of #DilipKumar sahab, one of the greatest actor and doyen of Indian Cinema. My thoughts and prayers are with his family. pic.twitter.com/uOS2y1Csi9
— Manoj Joshi (@actormanojjoshi) July 7, 2021
भारतातील सर्वोत्कृष्ट अभिनेता अशी उपमा दिलीप कुमार यांना साऊथ स्टार चिरंजीवीने दिलीये.
An Era comes to an END in the Indian Film Industry.Deeply Saddened by the passing of LEGEND #DilipKumar Saab. One of the GREATEST Actors India has ever produced,an Acting Institution & a National Treasure. Enthralled the world for several decades.May his soul Rest in Peace. pic.twitter.com/f5Wb7ATs6T
— Chiranjeevi Konidela (@KChiruTweets) July 7, 2021
कलाकारांसह अनेक राजकीय नेत्यांनी देखील भारतीय सिनेसृष्टीतील रियल हिरो गमावल्याचं म्हटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सिनेसृष्टीसाठी हे मोठं नुकसान असल्याचं म्हटलंय.सोबतच राहुल गांधी , ममता बॅनर्जी यांनी देखील दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Dilip Kumar Ji will be remembered as a cinematic legend. He was blessed with unparalleled brilliance, due to which audiences across generations were enthralled. His passing away is a loss to our cultural world. Condolences to his family, friends and innumerable admirers. RIP.
— Narendra Modi (@narendramodi) July 7, 2021
Saddened to hear about the demise of the veteran actor Dilip Kumar. We have lost a legend. Deep condolences to the grieving family and fans.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 7, 2021
शरद पवार यांनी दिलीप कुमार यांच्या परिवाराला या दु:खातून स्वत:ला सावरण्याचं बळ मिळो, अशी प्रार्थाना करत श्रद्धांजली वाहिली आहे.