दिलीप कुमार यांचं निधन झालं, पण त्यांचा २०१४ चा हा व्हिडीओ प्रेक्षकांना आवडतोय...पाहा

हे सर्व पाहताना प्रेक्षकांचे डोळे तर पाणावले पण एक उत्साह देखील आला. दिलीप कुमार यांचं ७ जून रोजी निधन झालं, पण हा त्यांचा व्हीडिओ आजही प्रेक्षकांना पाहायला आवडतोय... 

Updated: Jul 7, 2021, 11:50 PM IST

मुंबई : बॉलीवूडचा पहिला सूपर स्टार आणि सिल्व्हर स्क्रीनवरचा ट्रॅजडी किंग अर्थात दिलीप कुमार ... आपल्या करिअरची ६ दशके सिल्व्हर स्क्रीनवर काढणारा हा कलाकार, त्यांचा युसूफ खान ते दिलीप कुमार हा त्यांचा प्रवास त्यांनी मांडलाय, सस्टेन्स ऍण्ड शॅडो या त्यांच्या आत्मचरित्रात. तर हे आत्मचरित्र आपल्या शब्दांच्या ताकदीने उलगडलंय, दिलीप कुमार आणि सायरा बानो यांच्या फॅमिली फ्रेन्ड उदय तारा नायर यांनी. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मिस्टर परफेक्ट आमिर खान आणि महानायक अमिताभ बच्चन यांच्या हातात हात घेऊन दिलीप कुमार स्टेजकडे घेऊन आले, यावेळी अभिनेते धमेंद्र हे देखील होते, हे सर्व पाहताना प्रेक्षकांचे डोळे तर पाणावले पण एक उत्साह देखील आला. दिलीप कुमार यांचं ७ जून रोजी निधन झालं, पण हा त्यांचा व्हीडिओ आजही प्रेक्षकांना पाहायला आवडतोय... 

यावेळी अभिनेते धमेंद्र हे देखील होते, हे सर्व पाहताना प्रेक्षकांचे डोळे तर पाणावले पण एक उत्साह देखील आला. दिलीप कुमार यांचं ७ जून रोजी निधन झालं, पण हा त्यांचा व्हीडिओ आजही प्रेक्षकांना पाहायला आवडतोय...