तुम्ही शिल्पा शेट्टीचा 'पावरी' डान्स पाहिलात का?

शिल्पा कायम सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असते.   

Updated: Feb 24, 2021, 04:08 PM IST
तुम्ही शिल्पा शेट्टीचा 'पावरी' डान्स पाहिलात का? title=

मुंबई : सोशल मीडियावर यशराज मुखाते याचे सगळेच व्हिडीओ तुफान व्हायरल होत असताता. असाच एक व्हिडिओ काहिसा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'पावरी हो रही है' या व्हिडीओने  नेटकऱ्यांना वेड लावलं आहे. शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. राजने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो, ‘ये हमारा ब्रेकफास्ट है, ये हमारा व्ह्यू है, और ये हमारी पार्टी हो रही है’ असे बोलताना दिसत आहे. राजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शिल्पा शेट्टी आणि राज मालदीवला असल्याचे दिसत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Raj Kundra (@rajkundra9)

त्यांच्यासोबत त्यांचे मित्र-मैत्रीणी देखील असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत ‘पावरी हो रही है’ असे कॅप्शन दिले आहे. राज आणि शिल्पाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.अभिनेत्री शिल्पा शेट्टीने देखील 'पावरी हो रही है' असे म्हणत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

काही दिवसांपूर्वी 'पावरी हो रही है' असं म्हणत सोशल मीडियावर एका मुलीने शेअर केलेला व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर ‘पावरी हो रही है’ हा ट्रेंड सुरु झाला.पाकिस्तानी कॉन्टेंट क्रिएटर दनानीर मुबीन हिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता.दनानीर मुबीनने हा व्हिडीओ या व्हिडीओत ती ‘ये में हूं, ये हमारी कार है, और ये हमारी पावरी हो रही है’ असे बोलताना दिसत आहे. 

यावर अनेक मीम्स देखील व्हायरल झाले. या मेजशीर ट्रेंडमध्ये सर्वसामान्यांपासून ते बॉलिवूड सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतला आहे. एवढचं नव्हेतर सेलिब्रिटींना देखील पावरी हो रही है या व्हिडीओनं वेड लावल आहे...पार्टीला पावरी बोलण्याचा अंदाज नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे.