प्लास्टिक सर्जरीमुळं कियाराच्या सौंदर्यात भर? तिच्याकडूनच मोठा खुलासा

कियारा अडवाणी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. 

Updated: Aug 25, 2021, 03:59 PM IST
प्लास्टिक सर्जरीमुळं कियाराच्या सौंदर्यात भर? तिच्याकडूनच मोठा खुलासा title=

मुंबई : कियारा अडवाणी बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. 'कबीर सिंग'च्या यशानंतर, आता 'शेरशाह' मध्ये डिंपलच्या रूपात कियाराच्या साधेपणामुळे प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. कियारा अडवाणीने 2014 साली 'फगली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. जरी पहिल्या चित्रपटाने तिला फारसं नाव दिलं नाही, परंतु 2016 मध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत 'एमएस धोनी'.'द अनटोल्ड स्टोरी' मध्ये तिने साक्षी रावत ही भूमिका पार पाडली यानंतर तिचा क्यूटनेस चाहत्यांच्या हृदयात उतरला.पण यासोबतच कियाराच्या सौंदर्याबद्दलही प्रश्न निर्माण होऊ लागले. सोशल मीडियापासून ते बॉलिवूडच्या कॉरिडॉरपर्यंत चर्चा होती की कियारा अडवाणीने प्लास्टिक सर्जरी केली आहे. पण हे खरंच असं आहे का?

कियारा अडवाणी 'सौंदर्य'साठी झाली ट्रोल 
आजही सोशल मीडियावर कियारा अडवाणीबद्दल अशी चर्चा सर्रास होत आहे की तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे. युजर्स असंही लिहितात की, ज्याप्रकारे अभिनेत्रीने आपलं नाव आलियावरून बदलून कियारा केलं आहे, यावरुन तिने सुंदर दिसण्यासाठी सर्जरीचा अवलंब केलाच असेल. कियारा स्वतः म्हणते की, अनेकदा तिला अशा कमेंट्स वाचायला मिळतात. मात्र, ती असंही म्हणते की, जेव्हा-जेव्हा ती अशा कमेंट पाहते तेव्हा ती याकडे दुर्लक्ष करते.

अरबाज खानच्या 'पिंच' या टॉक शोमध्ये कियाराने आता अशा ट्रोलिंगला प्रत्युत्तर दिलं आहे. निर्मात्यांनी शोचा प्रोमो शेअर केला आहे, ज्यात कियारा म्हणते की, 'एका कार्यक्रमादरम्यान प्रत्येकजण चर्चा करत होते की, मी प्लास्टिक सर्जरी केली आहे.' कियारा म्हणते की, ''ही चर्चा इतकी वाढली होती की क्षणभर मलाही खात्री झाली की मी शस्त्रक्रिया केली आहे.''

'लोक म्हणू लागले, तिने प्लास्टिक सर्जरी केली आहे'
कियारा म्हणते, 'मी एका कार्यक्रमासाठी गेले होते, सोशल मीडियावर व्हायरल झालेले यावेळचे फोटोमध्ये लोकं तिच्या कमेंटमध्ये लिहित होते की, अरे, हिने प्लास्टिक सर्जरी केली आहे. परिस्थिती अशी होती की मी स्वतः विश्वास करू लागले की मी स्वतःसाठी काहीतरी केलं आहे. त्यामुळे कियाराच्या या वक्तव्यावरुन तिने कोणतीही सर्जरी केलेली नाही हे खरं

कियाराचं वर्कफ्रंट
'शेर शाह' नंतर, कियारा अडवाणी आता राज मेहता यांच्या 'जुग जुग जिओ' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती वरुण धवनसोबत दिसणार आहे. तर या चित्रपटात अनिल कपूर आणि नीतू कपूर मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय, अनीस बज्मीचा 'भूल भुलैया 2' देखील कियाराच्या लिस्टमध्ये आहे. या चित्रपटात ती कार्तिक आर्यन आणि तब्बूसोबत दिसणार आहे. कियारा पुढे रणवीर सिंगसोबत 'अन्नीयन'च्या हिंदी रिमेकमध्येही दिसणार आहे.