मुंबई : अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग 'डीआयडी लिटिल मास्टर्स' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये त्यांच्या रनवे 34 चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसणार आहेत. शोमध्ये अजय आणि रकुलने खूप धमाल केली. यादरम्यान अजय देवगणनेही त्याच्या सगळ्यात मोठ्या भीतीवरुन पडदा उचलला आहे.
अजय देवगणने लिफ्टबद्दलच्या त्याच्या फोबियाबद्दल खुलासा करताना सांगितलं की, "काही वर्षांपूर्वी मी लिफ्टमध्ये काही लोकांसोबत होतो, तेव्हा ती अचानक खाली गेली आणि तिसर्या मजल्यावरून तळमजल्यावर प्रचंड वेगाने आपटली. कोणीही गंभीर जखमी झालं नाही. आम्ही जवळपास 1 ते 1.5 तास तिथे अडकलो होतो."
अजय देवगण म्हणाला की, आजही तो लिफ्टमध्ये गेला तर त्याला थोडं टेन्शन येतं. यादरम्यान अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिनेही तिच्या सगळ्यात मोठ्या भीतीवरुन पडदा उचलला. ती म्हणाली की मला आजपर्यंत पोहता येत नाही. मला पाण्याची भीती वाटते. यादरम्यान कुमार सानूने गंमतीत सांगितलं की, मला भुताची भीती वाटते. म्हणूनच तो आई आणि वडिलांच्या मध्ये झोपायचा.
रनवे 34 चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला समीक्षकांकडून भरभरून दाद मिळत आहे. या चित्रपटात अजय आणि रकुल व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अंगिरा धर, आकांक्षा सिंह आणि अविनाश कुरी हे कलाकार दिसले आहेत. अजय देवगणने या चित्रपटाचं दिग्दर्शनही केलं आहे.