Indian Idol 12 : ध्वनि भानुशालीला कंटेस्टेंट्स निहालचं प्रपोज, हे पाहून सगळे झाले शॉक

निहालने एक गाणं एकदम फिल्मी स्टाइलमध्ये गाऊन जजना इंम्प्रेस करायचा प्रयत्न केला

Updated: Apr 8, 2021, 08:29 PM IST
Indian Idol 12 : ध्वनि भानुशालीला कंटेस्टेंट्स निहालचं प्रपोज, हे पाहून सगळे झाले शॉक title=

मुंबई : इंडियन आयडॉल सीझन 12 च्या आगामी भागामध्ये संगीत क्षेत्रातील लिविंग लीजेंड कल्याणजी - आनंदजी ही जोडी  उपस्थिती लावणार आहेत. या शोला चार चांद लागतील जेव्हा गायक  ध्वनि भानुशाली मंचावर पर्फामन्स सादर करेल. या शोची जज नेहा कक्कर आणि स्पर्धक निहालसोबत ती स्टेज शेअर करताना दिसणार आहे.

परदेसियों से ना अखियां मिलाना', 'न न करते प्यार' आणि "नीले नीले अंबर पर' या गाण्यांवर निहालचा जबरदस्त पर्फामन्सचं सर्व जजनी आणि आनंदजींनी कौतुक केले. तसंच, जेव्हा होस्ट ऋत्विकने ध्वनी आणि नेहा यांना विचारले की निहालच्या पर्फामन्सबद्दल तिची प्रतिक्रिया काय आहे.

तेव्हा ध्वनी शांत झाला, "मला वाटते की हा एक असाधारण गायक आहे पण त्याच्याकडे रोमांसची कमी आहे.' यानंतर नेहा ने पण सांगितलं, "हां, मला पण असं वाटत कि, जेव्हा रोमांसची गोष्ट येते. तेव्हा तो घाबरुन जातो " नेहा असंही म्हणाली की, "हो, मला असं वाटतं की जेव्हा रोमांन्स येतो तेव्हा तो चिंताग्रस्त होतो."

यानंतर, निहालने एक गाणं एकदम फिल्मी स्टाइलमध्ये गाऊन जजना इंम्प्रेस करायचा प्रयत्न केला. या फोटोत बघून असं वाटत आहे की, निहाने ध्वनीला प्रपोज केले आहे.हे पाहून मंचावरील हजेर असलेले सगळेच आश्चर्य चकीत झाले. यानंतर ध्वनी आणि नेहाने निहालसोबत "नीले-नील अंबर पर" आणि "दिलबर-दिलबर" गाणं गायलं

नेहा आणि ध्वनि या गंमतीवर निहाला म्हणाला,  मला कल्पनादेखील न्हवती की नेहा आणि ध्वनी माझी अशा प्रकारे फिरकी घेतली मीतर घाबरुन गेलो होतो. पण नंतर या क्षणांनंतर माझा दिवस बनून गेला. कारण मला या जगातल्या सूंदर गायिकांसोबत मला गायची संधी मिळाली.