‘बापू दे दे थोडा कॅश’- 'ढिंच्यॅक पूजा' घेऊन आली नवं गाणं

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये आणि प्रामुख्याने युट्युबवर 'ढिंच्यॅक पुजा' या नावाने धुमाकूळ घातला होता.

Updated: Sep 22, 2017, 06:46 PM IST
‘बापू दे दे थोडा कॅश’- 'ढिंच्यॅक पूजा' घेऊन आली नवं गाणं   title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियामध्ये आणि प्रामुख्याने युट्युबवर 'ढिंच्यॅक पुजा' या नावाने धुमाकूळ घातला होता.

अल्पावधीमध्ये तिच्या गाण्याच्या विचित्र स्टाईलची चर्चा झाली होती. 
काही तक्रारींनंतर 'ढिंच्यॅक पूजा'चे व्हिडिओ युट्युबवरून हटवण्यात आले होते. त्यामुळे सहाजिकच या 'ढिंच्यॅक पूजा'चे काही फॅन्स हिरमुसले होते. पण तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी तिने नवा व्हिडिओ अपलोड केला आहे.  
 ‘बापू दे दे थोडा कॅश’हे नवं गाणं घेऊन पूजा रसिकांच्या भेटीला आली आहे. सोशल मीडियामध्ये या गाण्याची धूम आहे.  

 
 ‘दिलो का स्कूटर’या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान 'ढिंच्यॅक पूजा'ने वाहतुकीचे नियम मोडले. हेल्मेट घातले नव्हते यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली होती. दरम्यान युट्युबवरून तिचे १२ व्हिडिओदेखील काढून टाकण्यात आले होते.  जुलै महिन्यापासून सोशल मिडीयापासून दूर राहिलेली ढिंच्यॅक पूजा आता परत आली आहे.  
 
 लवकरच सुरू होणार्‍या बिग बॉस ११ च्या पर्वामध्येही ढिंच्यॅक पूजाचे नाव असल्याची शक्यता आहे. परंतू अजूनही या विषयी कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.