'काही गोष्टी मोकळ्या...', घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ईशा देओलची 'ती' पोस्ट चर्चेत

हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भरत दिसला नव्हता, तेव्हापासून ईशा व त्याच्या नात्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. 

Updated: Jan 18, 2024, 04:41 PM IST
'काही गोष्टी मोकळ्या...',  घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ईशा देओलची 'ती' पोस्ट चर्चेत title=

Esha Deol Cryptic Post : दिग्गज अभिनेते धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओल ही केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही तर उत्तम नृत्यांगनाही आहे. गेल्या काही दिवसांपासून ईशा ही तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. ईशा देओलने तिचा पती भरत तख्तानीपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली आहे. तसेच ते दोघेही विभक्त झाल्याचे बोललं जात आहे. यादरम्यानच ईशा देओलने एक सूचक पोस्ट शेअर केली आहे. 

ईशा देओल ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच ईशाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने एका गाण्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती अभिनेता आफताब शिवदसानीसोबत डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत तिने त्याला हटके कॅप्शन दिले आहे. तिच्या कॅप्शनमुळे आता घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

ईशा देओलची सूचक पोस्ट

यात ती म्हणाली, "कधी कधी तुम्हाला काही गोष्टी मोकळ्या सोडाव्या लागतात आणि फक्त हृदयाच्या तालावर तुम्हाला नाचावे लागते. मी वयाच्या 18 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा माझा पहिला चित्रपट होता आणि मी फक्त 18 वर्षांची होते. गेल्या गुरुवारी 11 जानेवारीला माझ्या पहिल्या चित्रपटाला 23 वर्षे पूर्ण झाली आहेत. मी तेव्हा ही पोस्ट करायला विसरले. हा माझा पहिला चित्रपट असल्याने तो माझ्या हृदयाच्या कायमच जवळ असेल", असे ईशा देओलने म्हटले आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ESHA DEOL (@imeshadeol)

2002 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण

ईशा देओलने 2002 मध्ये कोई मेरे दिल से पुछ लो या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट होता. याचे दिग्दर्शन विनय शुक्ला यांनी केले होते. या चित्रपटात आफताब शिवदसानी आणि ईशा देओल हे प्रमुख भूमिकेत होते. तसेच यात संजय कपूर यांनी नकारात्मक भूमिका साकारली होती. तसेच यात जया बच्चन, अनुपम खैर, जसपाल भट्टी आणि राजपाल यादव हे सहाय्यक कलाकारांच्या भूमिकेत होते. हा चित्रपट 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या पिल्ली (Pelli) या तेलुगू चित्रपटाचा रिमेक होता. 

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ईशा तिचा पती भरत तख्तानीपासून विभक्त झाल्याच्या चर्चा आहेत. हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भरत दिसला नव्हता, तेव्हापासून ईशा व त्याच्या नात्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच आता तिच्या एका पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ईशा देओलने २९ जून २०१२ रोजी भरतशी लग्न केलं होतं. त्या दोघांचे लग्न इस्कॉन मंदिरात अत्यंत साधेपणाने झालं होतं. लग्नानंतर पाच वर्षांनी त्यांना राध्या ही मुलगी झाली आणि २०१९ मध्ये ईशाने दुसरी मुलगी मिराया तख्तानीला जन्म दिला होता.