लोकांच्या गरिबीविषयी हे काय बोलून गेला अभिनेता Prasad Oak, व्हिडीओ Viral

Prasad Oak नं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 

Updated: Dec 30, 2022, 12:18 PM IST
लोकांच्या गरिबीविषयी हे काय बोलून गेला अभिनेता Prasad Oak, व्हिडीओ Viral  title=

Prasad Oak Funny Video : मराठी अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. प्रसाद हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहतो. बऱ्याचवेळा तो मजेशीर व्हिडीओ शेअर करताना दिसतो. प्रसादनं नुकताच एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यानं लोकांच्या गरिबीवर प्रश्न केला आहे. 

प्रसाद ओकनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रसाद ओकनं निळ्या रंगाच्या छटांचं झिपर परिधान केलं आहे. या व्हिडीओमध्ये लोकांच्या गरिबीच्या अंदाजाविषय बोलत होता. व्हिडीओमध्ये प्रसाद बोलतो, लोकांच्या गरिबीचा अंदाज मला तेव्हा आला, जेव्हा त्यांनी माझी बाईक साफ करणारी फाटलेली चड्डीही चोरी केली. खरंतर हे स्वत: प्रसाद बोलत नसून व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला असलेला आवाज आहे. हिंदीत कोणी तरी हा डायलॉग बोलताना दिसत आहे. व्हिडीओत प्रसादनं दिलेलं. (Prasad Oak Viral Video)  हा व्हिडीओ शेअर करत काय करायचं या अशा लोकांचं ??? असे कॅप्शन दिले होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

प्रसाद ओकच्या या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'एकवेळ हरवलेले 50 हजार रुपये सापडतील....पण गाडी पुसायची चड्डी गेली की गेलीच...' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तो पण बाईक साफ करायला घेऊन गेला असणार, आता काय बोंबलायचं.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'ओक साहेब कायच करणार आता.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'अशा लोकांचं काही होऊ शकत नाही.' अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी प्रसादच्या या मजेशीर व्हिडीओवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. (Prasad Oak Funny Video) प्रसादचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

हेही वाचा : Rishabh Pant च्या कार अपघातानंतर Urvashi Rautela नं शेअर केली 'ही' पोस्ट

प्रसाद ओक हा मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. प्रसादनं फक्त चित्रपट नाही तर मालिकांमध्येही काम केलं आहे. प्रसादनं त्याच्या अभिनयानं सगळ्यांच्या मनात स्थान मिळवले आहे. काही दिवसांपूर्वी प्रसादचा 'धर्मवीर' (Dharmaveer)  हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात प्रसादनं धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांची भूमिका साकारली होती. 'धर्मवीर' चित्रपटाला मिळालेलं यश पाहता निर्मात्यांनी चित्रपटाचा दुसरा भाग (Dharmaveer 2) बनवण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटातली आनंद दिघे यांची भूमिका प्रसाद ओक साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पटकथा हे सगळं अभिनेता आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी केलं आहे.