मुलांचा संसार पुन्हा रुळावर? धनुष-ऐश्वर्याच्या कुटुंबियांकडून मोठं संकेत

'हम साथ साथ है'... घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार धनुष-ऐश्वर्या; कुटुंबियांकडून मोठा खुलासा  

Updated: Oct 11, 2022, 03:48 PM IST
मुलांचा संसार पुन्हा रुळावर? धनुष-ऐश्वर्याच्या कुटुंबियांकडून मोठं संकेत title=

मुंबई : नॅशनल अवॉर्ड विनर आणि अभिनेता धनुषला (aishwarya dhanush) लोकप्रियता मिळाली ती म्हणजे 2013 साली. त्यानंतर त्याने कधी मागे वळून पाहिलं नाही. धनुषच्या 'कोलावरी डी' या गाण्याला रसिकांनी भरभरून प्रेम दिलं. पण आता धनुष एका खासगी कारणामुळे चर्चेत आला. काही महिन्यांपूर्वी धनुष आणि ऐश्वर्याने घटस्फोट घेत विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण घटस्फोटानंतर धनुष-ऐश्वर्या पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. रंगणाऱ्या चर्चांवर धनुषचे वडील आणि प्रसिद्ध दिग्दर्शक कस्तुरी राजा यांचे वक्तव्य समोर आलं आहे. (aishwarya dhanush)

लेकाच्या घटस्फोटावर काय म्हणाले कस्तुरी राजा
धनुषचे वडील कस्तुरी राजा यांनी धनुष आणि ऐश्वर्याने घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांवर प्रथमच मौन तोडले आहे. आनंद विकतन या तामिळ भाषेतील मासिकाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, कस्तुरी यांना मुलगा धनुष आणि सून ऐश्वर्या यांच्या पॅच-अपबद्दल विचारण्यात आलं. कस्तुरी राजा यांनी या प्रश्नाचे थेट उत्तर देण्यास नकार दिला असला तरी, त्यांनी असंही सांगितले की, दोघांना त्यांच्या मुलांना आनंदी पाहायचं आहे. (dhanush father kasturi raja break the silence )

धनुष-ऐश्वर्या कोट्यधीश, एका चित्रपटासाठी घेतो ऐवढे पैसे

धनुष-ऐश्वर्याचं स्टेटमेंट
घटस्फोटाबद्दल जोडप्याने सोशल मीडियावर लिहिलं, आम्ही एकमेकांटे मित्र, कपल, पालक आणि एकमेकांचे शुभचिंतक बनून 18 वर्षांपर्यंत, समजूतदारपणा आणि भागीदारीचा मोठा पल्ला गाठला आहे. आज आम्ही जिथे उभे आहोत तिथून आपचे मार्ग वेगळे होत आहेत.'

'ऐश्वर्या आणि मी कपल म्हणून वेगळा होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी वेळ द्यायचा आहे. आमच्या निर्णयाचा आदर करा आणि आमच्या गोपनीयतेचा आदर करा.' असं देखील धनुष म्हणाला होता.