नवी दिल्ली : श्रीदेवीची मुलगी सध्या धर्मा प्रोडक्शनच्या 'धडक' मध्ये काम करत आहे. या सिनेमातून ती आपला बॉलीवूड डेब्यू करणार आहे. शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर या सिनेमात तिचा को-स्टार असणार आहे.
ईशानला नुकतेच 'बेस्ट अॅक्टर' पुरस्काराने गौरविले आहे.
'धडक' च्या सेटवरील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये फिल्म डिरेक्टर शशांक खेतान हा 'क्रू' च्या सर्व मेंबर्ससोबत दिसणार आहे.
या सिनेमाचे शुटींग राज्यस्थानच्या उदयपुरमध्ये होत आहे. फोटोच्या बरोबर मध्यावर अभिनेत्री जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर दिसणार आहे. सर्व क्रू मेंबर रांगेत उभे आहेत.