डॉ. अजितकुमार देवचे अर्धाकृती पुतळ्यांनी वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता

दुसऱ्या भागाची सोशल मीडियावर चर्चा 

Updated: Nov 26, 2021, 04:37 PM IST
डॉ. अजितकुमार देवचे अर्धाकृती पुतळ्यांनी वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता title=

मुंबई : एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटते पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो. चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी देवमाणूस ही मालिका प्रेक्षकांसमोर आली आणि अल्पावधीतच प्रेक्षकांनी ह्या मालिकेला डोक्यावर घेतलं. एक बोगस डॉक्टर जो गावातल्या भाबड्या लोकांना आपल्या बोलघेवड्या स्वभावाने तो भूरळ पाडतो. अल्पवधीतच गावात देवमाणूस म्हणून त्याची ख्याती पसरते. या देवमाणसाच्या बुरख्याआड लपला होता एक असा चेहेरा ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. अतिशय रंजक मर्डर मिस्ट्री या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

‘देवमाणूस ने १५ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता आणि त्यानांतर प्रेक्षक आणि चाहत्यांमध्ये चर्चा रंगली ती म्हणजे देवमाणूसच्या दुसऱ्या भागाची. तेव्हा पासून चाहते आणि प्रेक्षक या नवीन भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच या मालिकेचा टिझर रिलीझ झाला आणि प्रेक्षकांमध्ये या नवीन भागाबद्दल पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

अशातच एक महाराष्ट्रभर एक अशीगोष्ट बघायला मिळाली ज्याने प्रेक्षकांची या मालिकेच्या नवीन पर्वाबद्दलची उत्सुकता अगदी शिगेला नेली आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, मुंबई या ठिकाणी देवमाणूस मधील प्रमुख व्यक्तिरेखा डॉ अजितकुमार देवचे अर्धाकृती पुतळे पाहायला मिळले.

आपल्या ओळखीच्या परिसरात अचानक हे पुतळे पाहून प्रेक्षकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आणि त्यामुळे लोकांमध्ये हा चर्चेचा विषय झालाय. लोकं पुतळ्यासोबत सेल्फी काढून मालिकेविषयी आपलं प्रेम व्यक्त करत आहेत. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग जिवंत आहे की मेला आहे हा आणि असे अजून प्रश्न प्रेक्षकांसमोर आहे आणि याची उत्तर लवकरच त्यांना मिळतील. डिसेंबर महिन्यात ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून हे पर्व प्रेक्षकांना टीव्ही स्क्रीनला खिळवून ठेवेल यात शंकाच नाही.