इंस्टाग्राम अवॉर्ड्समध्ये विराट कोहली, दीपिका पादुकोण आणि ईशान खट्टरची धूम

नुकतेच इंस्टाग्रामने भारतातील इंस्टाग्राम अवार्ड्सची घोषणा केली आहे. यामध्ये भारतातील सेलिब्रिटी खेळाडू आणि कलाकार यांचा समावेश करण्यात आला आहे.

Updated: Mar 19, 2018, 07:17 PM IST
इंस्टाग्राम अवॉर्ड्समध्ये विराट कोहली, दीपिका पादुकोण आणि ईशान खट्टरची धूम  title=

मुंबई : नुकतेच इंस्टाग्रामने भारतातील इंस्टाग्राम अवार्ड्सची घोषणा केली आहे. यामध्ये भारतातील सेलिब्रिटी खेळाडू आणि कलाकार यांचा समावेश करण्यात आला आहे.

भारतामधील इंस्टाग्रामवर अ‍ॅक्टीव्ह असणार्‍या खेळाडू आणि कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे. 

भारतात पहिल्यांदा घोषित करण्यात आलेल्या इंस्टाग्राम अवार्ड्समध्ये विराट कोहली, प्रियांका चोप्रा, इशान खट्टर आणि दीपिका पादूकोण अशा सेलिब्रिटींचा समावेश करण्यात आला आहे.  

विराट कोहलीचं अकाऊंट Most Engaged Account

भारताचा कर्णधार विराट कोहलीचं अकाऊंट Most Engaged Account म्हणून गौरवण्यात आलं आहे. मार्च 2018 मध्ये त्याच्या अकाऊंटला 19.8 मिलियन फॉलोवर्स आहेत. 

दीपिका पादुकोणचं अकाऊंट Most Followed Account

अभिनेत्री दीपिका पादुकोणला Most Followed Account चा बहुमान मिळाला आहे. दीपिकाचे फॉलोवर्स 22.4 आहेत तर त्या पाठोपाठ प्रियांका चोप्राचा क्रमांक लागतो. प्रियांकाचे फॉलोवर्स 22 मिलियन तर आलिया भट्टचे फॉलोवर्स 20.8 आहेत. इंस्टाग्रामावर या अकाऊंट्सनी 2017 साली सर्वाधिक फॉलोवर्स मिळवले आहेत.  

इशान खट्टर Emerging Account

शाहिद  कपूरचा भाऊ इशान खट्टर धर्मा प्रोडक्शनच्या 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार करणार आहे. त्याआधीच त्याने इंस्टाग्रामचा एक अवॉर्ड पटकावला आहे. इसानच्या अकाऊंटला 'Emerging Account' म्हणून गौरवण्यात आलं आहे. 2017 साली त्याच्या अकाऊंटवर फॅन्सचं कमाल फॉलोविंग आहे.  

तर श्रद्धा कपूर आणि आलिया भट्ट्चा गौरव हा इंस्टाग्ररमवर 20 मिलियन फॅन्स असल्याने करण्यात आला.