दीपिका पदुकोणच्या आईला पसंत नव्हता रणवीर सिंह, अभिनेत्यानेच केला खुलासा, म्हणाला...'

दिपीकाच्या घरात आता सर्वांचा लाडका असणारा रणवीर  सुरुवातीच्या दिवसांत मात्र नावडता होता. 

Updated: Aug 1, 2023, 09:28 PM IST
दीपिका पदुकोणच्या आईला पसंत नव्हता रणवीर सिंह, अभिनेत्यानेच केला खुलासा, म्हणाला...' title=

मुंबई : अभिनेता रणवीर सिंहचा नुकताच रॉकी और रानी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या सिनेमाला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळत आहे. या सिनेमात लवस्टोरी आणि फॅमेली कॉन्फलिक्ट दाखवण्यात आला आहे. सिनेमामुळे चर्चेत असणारा अभिनेता कधी त्याच्या अतंरगी फॅशमुळे चर्चेत असतो तर कधी तो त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो. नुकताच रणवीर सिंहने खुलासा केला आहे की, त्याने त्याच्या रिअल लाईफमध्ये बऱ्याच गोष्टींचा सामना केला आहे.

दिपीकाच्या घरात आता सर्वांचा लाडका असणारा रणवीर  सुरुवातीच्या दिवसांत मात्र नावडता होता. याचा खुलासा स्वत: रणवीरने एका मुलाखती दरम्यान केला आहे. रणवीरने सांगितलं की, जेव्हा तो दीपिका पदुकोणशी लग्न करणार होता, तेव्हा अभिनेत्रीच्या कुटुंबीयांना रणवीरबद्दल काही विशेष समजलं नव्हतं. दीपिकाच्या नात्याबद्दल तिच्या सासूबाईंना काहीच समजत नव्हतं. तिला रणवीरचा स्वभाव नेमका कसा आहे हे समजत नव्हतं. मात्र, आता तो सासूचा लाडका झाला आहे.
 
रणवीर हा सिंधी कुटुंबातून आहे. तर दिपीका ही दक्षिण भारतीय कुटुंबातून आहे. त्यामुळे दोघांमध्ये कल्चरचा फरक आहे. अशा परिस्थितीत दोन कुटुंबांमध्ये कौटुंबिक मतभेद होणं ही एक सामान्य गोष्ट आहे.याचा खुलासा अभिनेत्याने त्याच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान केला होता.  त्याने सांगितलं की, जेव्हा रणवीर आणि दीपिकाने त्यांच्या पालकांना त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांना सुरुवातीला हे नातं समजायला वेळ लागला. मात्र कालांतराने सगळच सुरळीत झालं.

आपल्या सासूबद्दल बोलताना रणवीर पुढे म्हणाला, सुरुवातीला माझ्या सासूला मी समजलो नाही,  रणवीरने सांगितले की त्याच्या आणि सासूमध्ये समजूत काढण्यासाठी 4-5 वर्षे लागली आणि आता तो त्याच्या सासूचा आवडता व्यक्ती बनलो आहे. पुढे अभिनेत्याने सांगितले की, जेव्हा दीपिकाच्या आईला त्याच्याबद्दल आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल कळलं तेव्हा तिला समजलं की, तो कसाही असला तरी त्याचे मनाने स्वच्छ आहे आणि तो एक चांगला मुलगा आहे.