दीपिका-रणवीरची या ठिकाणी झाली पहिली भेट

 बॉलिवूडचं पॉवर कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लव्हस्टोरीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे

Updated: Jan 25, 2022, 08:48 PM IST
 दीपिका-रणवीरची या ठिकाणी झाली पहिली भेट title=

मुंबई : बॉलिवूडचं पॉवर कपल दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या लव्हस्टोरीबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. दीपिका-रणवीरच्या चाहत्यांना आतापर्यंत माहित होतं की, दोघंही रामलीला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जवळ आले होते पण सत्य काही वेगळंच आहे. दीपिका पदुकोणने स्वतः तिच्या आणि रणवीर सिंगच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं आहे.

सिंगापूरमध्ये एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची पहिली भेट एका चॅट शोदरम्यान झाली होती. याच चॅट शोमध्ये जेव्हा दीपिकाला विचारण्यात आलं की, कधी कळालं की तो स्पेशल आहे? या प्रश्नावर दीपिका म्हणाली, तिला आठवतं, तिने यशराजच्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं होतं आणि रणवीर सिंगही तिथे उपस्थित होता. त्यावेळी रणवीर सिंग तिच्यासोबत खूप फ्लर्ट करत होता.

दीपिकाने सांगितलं की, त्यावेळी तो दुसऱ्या कोणाला तरी डेट करत होता. तिच्या लव्हस्टोरीबद्दल बोलताना दीपिकाने सांगितलं की, जेव्हा रणवीर तिच्यासोबत फ्लर्ट करत होता तेव्हा ती फक्त हसत होती, त्यानंतर तिने रणवीरला सांगितलं की तू माझ्यासोबत फ्लर्ट कर. दीपिकाने सांगितलं की, तिच्या प्रश्नावर रणवीर म्हणाला, तो फ्लर्ट करत नाहीये... अशा प्रकारची मजा तिला पहिल्यांदाच जाणवली.

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांची लव्हस्टोरी राम लीला चित्रपट सुरू होण्यापूर्वीच सुरू झाली होती. रामलीला या चित्रपटासाठी दीपिका आणि रणवीर संजय भन्साळी यांच्या घरी लंचसाठी भेटले होते, तिथे दीपिका पदुकोणच्या दातात काहीतरी अडकलं होतं. त्यानंतर रणवीरने दीपिकाला हातवारे करून सांगितलं की, तिच्या दातांमध्ये काहीतरी अडकलं आहे. त्यानंतर दीपिकाने रणवीर सिंगसोबत मस्ती करताना 'तुम निकल दो' म्हटलं, इथूनच दोघांची भेट झाली आणि आज ते बॉलिवूडचं पॉवर कपल मानलं जातं.