कधीही पाहिला नसेल दीपिकाचा इतकं बोल्ड रुप; पाहा Romantic Video

काही सेकंदांमध्ये मनात कायमचं घर करुन जात आहे.   

Updated: Dec 20, 2021, 12:02 PM IST
कधीही पाहिला नसेल दीपिकाचा इतकं बोल्ड रुप; पाहा Romantic Video  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेत्री दीपिका पदुकोण हिनं कायमच तिच्या वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. दीपिका आणि रणवीर यांनीही एक कपल म्हणून चाहत्यांना कायमच भारावून सोडलं आहे. 

जितक्या वेळेस दीपिका आपल्या समोर येते तितक्या प्रत्येक वेळी तिच्यावरुन नजर काही सहजासहजी हटलेली नाही. 

आताही असंच होतंय. किंबहुना दीपिकाचा कधीही न पाहिलेला बोल्ड आणि तितकाच रोमँटिक अंदाज सर्वांच्याच भेटीला आला आहे. 

कायमच रुपेरी पडद्यावर रणवीरसोबतच्या केमिस्ट्रीमुळं चर्चेत असणारी दीपिका यावेळी मात्र अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी याच्यासोबतच्या केमिस्ट्रीमुळं प्रकाशझोतात आली आहे.

नुकतीच दीपिकानं सिद्धांत चतुर्वेदीसोबतच्या आपल्या खास आणि आगामी प्रोजोक्टची घोषणा केली आहे. 

'गहराईयाँ' असं तिच्या आगामी चित्रपटाचा एक सुरेख टीझरही तिनं पोस्ट केला. 

'माझ्या हृदयाचा एक भाग...' असं कॅप्शन लिहित दीपिकानं हा व्हिडीओ शेअर केला आहे. 

दीपिकाच्या बिकीनी लूकपासून ते अगदी तिच्या हेअरस्टाईलपर्यंत सर्वकाही या अवघ्या काही सेकंदांमध्ये मनात कायमचं घर करुन जात आहे. 

शकुन बत्रा दिग्दर्शिक या चित्रपटाचं चित्रीकरण यंदाच्याच वर्षी पूर्ण झालं आहे. 25 जानेवारीला हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.