जेव्हा दीपिका रणवीरला म्हणाली,'तुम मेरे सुपर ड्रग हो'

सुशांतच्या आत्महत्येनंतर समोर आल्या धक्कादायक गोष्टी 

Updated: Sep 22, 2020, 03:34 PM IST
जेव्हा दीपिका रणवीरला म्हणाली,'तुम मेरे सुपर ड्रग हो'  title=

मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्सच्या अँगलने तपास केला जात आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो आता बॉलिवूडपर्यंत ड्रग्स पोहोचवणाऱ्या चेनला क्रॅक करण्यात प्रयत्नशील आहे. NCB च्या चौकशीत या संदर्भातील चॅट समोर आले आहेत. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचं नाव देखील समोर आलं आहे. 

ड्रग्स एँगलमध्ये दीपिकाचं नाव आल्यावर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. दुसरीकडे कंगनाने देखील दीपिकावर टीका करायला सुरूवात केली आहे. दीपिकाचं नाव या कनेक्शनमध्ये समोर आल्यानंतर तिची जुनी पोस्ट, चॅट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने रणवीर सिंहला 'सुपर ड्रग' म्हटलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

& you...my super drug!

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on

ही पोस्ट नोव्हेंबर २०१९ ची आहे जेव्हा दीपिकाने रणवीर सिंहसोबतचा एक फोटो शेअर केला होता. जिथे रणवीर सिंहच्या टीशर्टच बॅक दिसत आहे. टीशर्टवर लिहिलं आहे की Love is a super power म्हणजे प्रेम एक सुपर पॉवर आहे. या फोटोसोबत दीपिकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,'..आणि तू माझा सुपर ड्रग आहे.' दीपिकाच्या या पोस्टला जवळपास १ करोड लोकांनी लाईक केलं आहे. 

आतापर्यंत समोर आली ही नावं 

ड्रग चॅट समोर आल्यानंतर आता लोकं याचा वेगवेगळा अर्थ लावत आहेत. असं म्हटलं जातंय की, लवकरच NCB दीपिका पादुकोणला समन देऊ शकते. आतापर्यंत ड्रग्स प्रकरणात रकुल प्रीत, सारा अली खान, रिया चक्रवर्ती आणि श्रद्धा कपूर या अभिनेत्रींची नाव समोर आली आहे.