दीपिका पदुकोण का साइन करत नाही कोणतेही सिनेमे?

हे आहे खरं कारण 

दीपिका पदुकोण का साइन करत नाही कोणतेही सिनेमे?  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण 'पद्मावत' या सिनेमांत दिसली. या सिनेमाने भरपूर कमाई केली. वर्ल्डवाइड या सिनेाने 500 करोडचा गल्ला जमवला आहे. पद्मावत या सुपरहिट सिनेमानंतर दीपिकाने आतापर्यंत कोणताही सिनेमा साइन केलेला नाही. याबाबत सोशल मीडियावर अनेक चर्चा रंगल्या. 

रणवीर सिंहसोबत लग्न होत असल्यामुळे तिने अजून कोणताही सिनेमा घेतला नाही अशी देखील चर्चा होती. तसेच दीपिकाच्या मानेवर आणि खांद्यावर दुखापत झाल्यामुळे सध्या ती आराम करत आहे असं देखील सांगण्यात आले. मात्र अखेर याच खरं कारण समोर आलेलं आहे की, दीपिका स्क्रिप्ट आणि फी याचा विचार करता कोणताही सिनेमा साइन करत नसल्याचं कळलं आहे. 

दीपिकाचं लग्न किंवा तिची तब्बेत हे कारण नसून तिला आवडणारी स्क्रिप्ट अद्याप मिळालेली नसल्यामुळे तिने कोणताच सिनेमा स्विकारलेला नाही. तिला अशा सिनेमांत काम करायचंय जिथे फीमेल रोलसुद्धा मेल रोलप्रमाणेच महत्वाचा असेल. तसेच या सिनेमांत कंटेट महत्वाचा असल्याचं देखील ती म्हणाला. आणि दुसरा मुद्दा असा की तिची फी हे देखील तितकेच महत्वाचे कारण आहे.