लॉस एंजेलिस : बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पादुकोण फोर्ब्सच्या अहवालानुसार २०१७ मधील जगातील सर्वात जास्त करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीतून बाहेर झाली आहे. या यादीत हॉलीवुड अभिनेत्री एमा स्टोन टॉपला आहे. २०१६ मध्ये दीपिका १० व्या स्थानावर होती. परंतू, 'एक्सएक्सएक्स : रिटर्न ऑफ क्जेंडर केज' या चित्रपटातून आपल्या हॉलिवूड करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री एमा स्टोन हीने या यादीत स्थान पटकावले आहे.
जेनिफर एनिस्टन दुसऱ्या क्रमांकावर:
स्टोन (२८) हीने 'ला ला लँड' मधून २.६ कोटी डॉलरची कमाई केली. २.५५ कोटी डॉलर कमाई असलेली अभिनेत्री जेनिफर एनिस्टन ही दुसऱ्या क्रमांकावर आहे. लॉरेंस या अभिनेत्रीची कमाई २.४ कोटी डॉलर असून यंदाच्या वर्षी ती तिसऱ्या क्रमांकावर आहे. २०१६ मधील कमाईच्या तुलनेत ही अर्धी कमाई आहे. मेलिसा मैक्कार्थी, मिला कुनिस आणि एमा वॉटसन या अनुक्रमे चवथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.