हुड हुड दबंग....... लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला

सलमान खानचा दबंग-3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Updated: Jan 18, 2019, 06:15 PM IST
हुड हुड दबंग....... लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीला title=

मुंबई:अभिनेता सलमान खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा दबंग-3 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दबंग-3 सिनेमा अधिक चांगला आणि मोठा असणार आहे.सूत्रांच्या सांगण्यानुसार सालमानच्या दबंग-3 मध्ये खलनायकाची भूमिका कन्नाडी अभिनेता किच्चा सुदीप  साकारणार आहे. 15 जानेवारीला सुदीपच्या पैलवान सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.त्याच्या सिनेमाचा ट्रेलर सलमानने ट्विटरवर शेअर केला. सध्या तरी सुदीपला कास्ट करणार की नाही यावर ठोस विचार झालेला नाही. सलमान खान आणि सुदीप फार काळापासून एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. दबंग आणि दबंग-2 सिनेमांनी बॉक्सऑफिसवर चांगलाच कल्ला केला होता.

 

सूत्रांच्या सांगण्यानुसार, सिनेमाचे दिग्दर्शन प्रभू देवा करणार आहेत. सुदीपला सिनेमाविषयी कल्पनाही देण्यात आली. सिनेमासाठी सुदीप होकार दिला. सिनेमाची निर्मिती अरबाज खान करणार आहेत.सिनेमाची शूटिंग एप्रिलमध्ये सुरु होणार.सिनेमाचे शूटिंग 90-100 दिवस चालणार आहे. 2019 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी सिनेमा प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. सलमानचा दबंग-3 आणि रणबीरचा ब्रह्मास्त्र या सिनेमांची बॉक्सऑफिसवर टक्कर होण्याची शक्यता आहे.