क्रिकेटर्सच्या बहिणी फक्त सुंदरचं नाही, तर आहेत 'सोशल मीडिया क्विन'

भारतील क्रिकेट संघातील खेळाडूंच्या बहिणींचा सोशल मीडियावर बोलबाला  

Updated: Jan 14, 2022, 09:05 AM IST
क्रिकेटर्सच्या बहिणी फक्त सुंदरचं नाही, तर आहेत 'सोशल मीडिया क्विन' title=

मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील काही असे खेळाडू आहेत, ज्यांची प्रसिद्धी एका बॉलिवूड अभिनेत्यापेक्षा कमी नाही. फक्त खेळाडूचं नाही तर त्यांच्या बहिणी देखील तितक्याचं प्रसिद्ध आहेत. भाऊ क्रिकेटचा मैदान गाजवतात तर त्यांच्या बहिणी सोशल मीडिया क्विन आहे. असे अनेक क्रिकेटर आहेत, ज्यांच्या बहिणींचे सोशल मीडियावर फॉलोव्हर्स खूप आहेत. तर आज जाणून घेवू अशा 'स्वीट सिस्टर्स'बद्दल...

साक्षी पंत

साक्षी पंत
ऋषभ पंत (Rishabh Pant) ची बहन साक्षी पंत (Sakshi Pant) प्रचंड स्टायलिश आहे. तिने परफेक्ट फिगर मिळवण्यासाठी चक्क 19 किलो वजन कमी केलं.  इन्स्टाग्रामवर तिचे 1 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. 

मालती चाहर 

मालती चाहर
क्रिकेटर दीपक चाहर (Deepak Chahar) आणि राहुल चाहर (Rahul Chahar) यांची बहिण मालती चाहर (Malti Chahar) एक मॉडेल आहे. तिने 'रन द वर्ल्ड' या लोकप्रिय गाण्यात ड्वेन ब्राव्होसोबत परफॉर्म केलं. ती आता तमिळ चित्रपटसृष्टीतही पदार्पण करणार असल्याचं समोर येत आहे. इंस्टाग्रामवर तिचे 6 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

भावना कोहली

भावना कोहली
कसोटी कर्णधार विराट कोहलीची बहिण भावना कोहलीने तिचं शिक्षण दिल्लीच्या हंसराज मॉडल स्कूल आणि दौलत राम कॉलेजमधून पूर्ण केलं आहे. भावनाचं लग्न संजय धिंग्रासोबत झाले असून त्यांना मेहक आणि आयुष अशी दोन मुले आहेत. इंस्टाग्रामवर भावनाचे 1 लाख 21 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

रितिका सजदेह

रितिका सजदेह
रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगची मानेलली बहीण आहे. युवीनेच रोहित आणि रितिका यांची ओळख करून दिली. रितिका सोशल मीडियावर खूप प्रसिद्धआहे, तिचे इंस्टाग्रामवर 2.1 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

श्रेष्ठा अय्यर

श्रेष्ठा अय्यर
क्रिकेटर श्रेयस अय्यरची बहीण श्रेष्ठा अय्यरचा भावासारखाच विनोदी स्वभाव आहे. ती व्यवसायाने डान्सर आणि कोरिओग्राफर आहे. सोशल मीडियावर तिचे व्हिडीओ चाहत्यांना प्रचंड आवडतात. इंस्टाग्रामवर तिचे 41 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.