बॉलीवूडवर कोरोनाचा कहर; कलाकारांना विकावी लागली प्रॅापर्टी, तर काहींनी सोडली मुंबई

 गेल्या एका वर्षात अनेक छोट्या कलाकारांनी मायानगरी मुंबईला निरोप दिला आहे.

Updated: Apr 4, 2021, 01:08 PM IST
बॉलीवूडवर कोरोनाचा कहर; कलाकारांना विकावी लागली प्रॅापर्टी, तर काहींनी सोडली मुंबई title=

मुंबई :  कोरोनाने देशात गेल्या 12 ते 15 महिन्यांत जो कहर केला आहे, ज्यामुळे फक्त सामान्य वर्गातील कुटुंबांचीच आर्थिक स्थिती बिकट झाली नाही. तर याचा परिणाम ग्लॅमरस फिल्म इंडस्ट्रीवरही झाला आहे. अशा परिस्थितीत, गेल्या एका वर्षात अनेक छोट्या कलाकारांनी मायानगरी मुंबईला निरोप दिला आहे.

काही स्टार्सनी त्यांच्या घराची सुरक्षा कमी केली, तर डिझायनर कपड्यांची मागणी देखील निम्म्यावर आली आहे. काही लोकांना आपली जीवनशैली टिकवण्यासाठी आपली मालमत्ता देखील विकावी लागली. परंतु बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडामध्ये मोठी गुंतवणूक केली होती. जेव्हा कोरोनामुळे त्यांच्या कमाईचे सगळेच मार्गाने बंद झाले, तेव्हा बॉलिवूड स्टार्सनी गुंतवणूकीद्वारे पैसे कमावण्याची संधी शोधली.

काही मोजकेच असे स्टार्स आहेत, ज्यांना कोरोना आणि लॉकडाऊनमुळे फारसा परिणाम झाला नाही. परंतु उर्वरित बॉलीवूड इंडस्ट्रीवरला हे संकट त्रास देत आहे. बॉलिवूडमधील अनेक प्रॉडक्शन हाऊस,  थिएटर आणि मल्टिप्लेक्स 2021 मध्ये पुन्हा चालू झाले आणि ते पूर्व पदावर येणार इतक्यातच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे निर्माते पुन्हा माघार घेताना दिसत आहेत. त्याचा परिणाम संपूर्ण बॅालिवूड  इंडस्ट्रीला भोगावा लागणार आहे.

कमी चित्रपट, 80% कमी रेवेन्यू

बॉलिवूडमध्ये 2019 मध्ये एकूण 1 हजार 833 चित्रपट प्रदर्शित झाले होते. तर 2020 मध्ये केवळ 441 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. चित्रपटांची थिएटरमधून होणारी कमाई 80% कमी झाली आहे. फिक्कीच्या नुकत्याच आलेल्या अहवालात म्हटले आहे की, मनोरंजन क्षेत्राचे एकूण उत्पन्न 24% खाली आले आहे.

डिझाइनर कपड्यांची मागणी 50% : अंजू मोदी

आता सेलिब्रिटी डिझाइनर कपडे खूप कमी ऑर्डर करत आहेत. सेलिब्रिटी फॅशन डिझायनर, 'बाजीराव मस्तानी' आणि 'रामलीला' कॉस्ट्यूम डिझायनर अंजू मोदी सांगतात की, "प्रत्येक दिवशी मला कलाकारांच्या ड्रेसच्या ऑर्डर मिळायच्या, पण कोरोनाकाळात सर्व काही थांबले आहे. ऑर्डर 50%  आहेत, यामुळे मला माझा स्टाफ 50% कमी करावा लागला आहे." शूटिंग व्यतिरिक्त, स्टार्स रेड कार्पेट, पार्टीज, स्पेशल मीटिंग्ज किंवा इव्हेंटसाठी ड्रेस ऑर्डर करत असतात.

बॉलिवूडच्या सुरक्षा सेवा 50% कमी

देशातील सर्वात जुनी सुरक्षा असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष गुरचरणसिंग चौहान म्हणतात की, "आपल्या देशातील आमच्या सिक्योरिटीमधीला पाच टक्के सिक्योरिटी गार्ड बॉलिवूड-सेलिब्रिटींसाठी काम करते, कोरोनामुळे त्यामध्ये 50 टक्क्यांची घट झाली आहे."

आर्थिक संकटात बॉलिवूड

अभिनेता पीयूष मिश्रा म्हणतात, "संघर्ष करणार्‍या आणि दैनंदिन मिळकत मिळणाऱ्या कलाकारांची अवस्था वाईट आहे. काही लोकांनी त्यांची प्रॉपर्टी देखील विकली आहे. माझ्या आजूबाजूचे बरेच कलाकार खर्च परवडत नाही म्हणून  मुंबई सोडून आपल्या शहरात परतले आहेत."

चित्रपट अभिनेता इसराइल खान सांगतो, "माझ्यासारख्या अभिनेत्याला जिम आणि कसरत करणे शक्य नाही. पूर्वी मी माझ्या जॅग्वारबरोबर मीटिंगसाठी जात असे, आता मी टॅक्सीने जातो.  मागील एक वर्षापासून उत्पन्नाचा स्रोत जवळजवळ बंद आहे."

खर्च पूर्णपणे नियंत्रणात असतो

"टीव्ही कलाकारांचा बहुतेक खर्चहा जीवनशैली टिकवण्यासाठी होतो", असे वक्तव्य इंडियन फिल्म ऍन्ड टेलीव्हीजन प्रोड्यूसर काउंसिल टीव्ही ऍन्ड वेब सीरिजचे  चेअरपर्सन जेडी मजीठिया यांनी केले. ड्रेस, पार्लर, महागड्या हॉटेलमध्ये जेवणे, शूट इत्यादींचा खर्च आता कमी झाला आहे.

चित्रपटाचे निर्माता आणि व्यापार विश्लेषक गिरीश वानखेडे यांच्या म्हणण्यानुसार, "ए ग्रेड कलाकार दोन वर्ष आधीच करार करतात आणि फीच्या 25% व्याज घेतात, परंतु असे करणारे केवळ कमीच कलाकार आहेत. या व्यतिरिक्त 70 टक्के इंडस्ट्री ही दररोजच्या कमाईवर चालतो.  त्यामुळे आता एखाद्या पार्टीत जाणे, पार्टीचे आयोजन करणे, मालमत्तेत गुंतवणूक करणे पूर्णपणे थांबले आहे."

या स्टार्सवर कोणताही परिणाम नाही

फोर्ब्सच्या यादीमध्ये 2020मध्ये जगातील सर्वाधिक कमाई करणार्‍या १० कलाकारांपैकी भारताचा फक्त अक्षय कुमारच होता. चित्रपटांव्यतिरिक्त अ‍ॅन्डोर्समेंट आणि अन्य स्रोतांमधून वर्षाला 362 कोटी रुपये कमावणारा अक्षय कुमार या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.  सन २०२० मध्ये चित्रपटांच्या फीच्या बाबतीत अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान आणि अजय देवगन हे इंडस्ट्रीतील पहिल्या 5 कलाकारांमध्ये आहेत. अर्थात, 2020 मध्ये आमिर खान कोणताही चित्रपट करु शकला नाही, परंतु लालसिंग चड्ढासाठी घेतलेल्या फीच्या आधारे तो चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपली जीवनशैली टिकवण्यासाठी त्यांना फारसा त्रास सहन करावा लागला नाही.