13 वर्षांच्या बहिणीसोबत लग्न करणाऱ्या गायकाचे निधन, वयाच्या 77 व्या वर्षापर्यंत होत्या 7 बायका

संपूर्ण सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.

Updated: Oct 29, 2022, 02:06 PM IST
13 वर्षांच्या बहिणीसोबत लग्न करणाऱ्या गायकाचे निधन, वयाच्या 77 व्या वर्षापर्यंत होत्या 7 बायका title=

मुंबई : अमेरिकेतील प्रसिद्ध गायक, पियानो वादक आणि गीतकार जेरी ली लुईस (Jerry Lee Lewis) यांचे निधन झाले आहे. जेरी ली लुईस हे 87 वर्षांचे होते. त्यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांचे प्रतिनिधी झॅक फर्नम यांनी एका मीडिया हाऊसला मेलद्वारे केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी सात वेळा लग्न बंधनात अडकलेल्या आणि वादग्रस्त गायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेरीच्या मृत्यूच्या अफवा पसरल्या होत्या. 

लुईसचे डेसोटो काउंटी, मिसिसिपी येथील त्याच्या घरी निधन झाले. शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत त्यांची सातवी पत्नी ज्युडिथ उपस्थित होती. या महिन्यात लुईसच्या अधिकृत पेजवर केलेल्या पोस्टनुसार, तो बऱ्याच काळापासून आजारी होते. 19 ऑक्टोबर रोजी सोशल मीडिया व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, "जेरी ली लुईस यांना रविवारी कंट्री म्युझिक हॉल ऑफ फेममध्ये इंट्रोट्यूस करण्यात आले होते. लुईस समारंभाच्या वेळी अत्यंत आजारी होते. त्यांना फ्लू झाला होता. एका रिपोर्टनुसार, यादरम्यान ते खूप आजारी होते आणि ते त्याच्या चाहत्यांना म्हणाले, "मी माझे विचार वैयक्तिकरित्या तुमच्यापर्यंत शेअर करण्याऐवजी माझ्या बेडवरून तुम्हाला एक संदेश पाठवत आहे. ही तुमच्यासाठी दुःखी आणि निराश करणारी बातमी आहे."

controversial singer jerry lee who married his first cousin dies at the age of 87 had 7 wifes

1935 मध्ये फेरीडे, लुईझियाना येथे जन्मलेले जेरी ली लुईस 14 वर्षांचे होते जेव्हा त्यांनी त्यांचा पहिला परफॉर्मन्स दिला. 1957 मध्ये, जेव्हा लुईस 22 वर्षांचे झाले तेव्हा त्यांनी त्यांची चुलत बहीण मायरा गॅल ब्राउनशी लग्न केले, ज्या त्यावेळी फक्त 13 वर्षांच्या होत्या. मायरानं तिच्या लग्नाच्या परवान्यात 20 वर्षांची असल्याचा दावा केला होता. यावर जोरदार चर्चा झाली आणि लुईसच्या करिअरला ब्रेक लागला. (controversial singer jerry lee who married his first cousin dies at the age of 87 had 7 wifes) 

controversial singer jerry lee who married his first cousin dies at the age of 87 had 7 wifes

तसे, याआधी लुईसनं दोन वेळा लग्न केलं होतं. त्याने 1952 मध्ये डोरोथी बर्टनशी पहिले लग्न केले, 1953 मध्ये त्यानं घटस्फोट घेतला. त्यांचे दुसरे लग्न 1953 मध्ये जेन मिचमशी झाले होते. त्यानंतर त्यांनी 1957 मध्ये घटस्फोट घेतला. चौथा विवाह 1971 मध्ये जेरेन एलिझाबेथ गन पेट यांच्याशी झाला, ज्यांचं निधन 1982 मध्ये झालं. 1983 मध्ये, लुईस यांनी पाचव्यांदा लग्न केलं असून त्यांच्या पत्नीचं नाव सीन स्टीफन्सशी होते, त्याच वर्षी ते विभक्त झाले.  मेरी मॅककार्व्हरसोबत1984 मध्ये जेरी यांनी सहाव्यांदा लग्न केले. जिच्याशी त्यानं 2005 मध्ये घटस्फोट घेतला. जेरी यांनी 2012 मध्ये वयाच्या 77 व्या वर्षी ज्युडिथशी सातवे लग्न केले. जुडिथ ही त्यांची तिसरी पत्नी मायरा गेल ब्राउनचा भाऊ म्हणजेच (जेरीचा चुलत भाऊ) ची पूर्वाश्रमीची पत्नी आहे.