Confirmed : सलमान खान आता 'या' अभिनेत्याच्या मुलीला करणार लाँच

या अभिनेत्यासोबत करणार पदार्पण 

Confirmed : सलमान खान आता 'या' अभिनेत्याच्या मुलीला करणार लाँच  title=

मुंबई : सलमान खान आपल्या अभिनयाप्रमाणेच आणखी एका गोष्टीसाठी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे. ती गोष्ट म्हणजे स्टार किड्सना लाँच करणं. आता अशाच एका बॉलिवूड स्टारच्या मुलीला सलमान खान लवकरच लाँच करणार आहे. या स्टार किडसोबत आणखी एक नवा कलाकार प्रेक्षकांच्यासमोर येणार आहे. 

महत्वाची बाब म्हणजे सलमान खानच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत हा सिनेमा लाँच करणार आहे. सलमान खान अभिनेता मोनीश बहलच्या मुलीला प्रनुतनला लवकर लाँच करणार आहे. सलमान खानच्या प्रोडक्शनमार्फत ती डेब्यू करत आहे. जहीर इकबालसोबत प्रनुतन दिसणार आहे. स्वतः सलमान खानने याची पुष्टी केली आहे. 

ही पोस्ट शेअर करताना सलमान खानने म्हटलं आहे की, ही बघा ! जहरोची हिरोईन अखेर मिळाली. स्वागत करा प्रनुतन बहलचं. नुतन या ज्येष्ठ अभिनेत्रीची नातं आणि मोनीश बहलची मुलगी आता मोठ्या पडद्यावर एन्ट्री करत आहे. मला खूप अभिमान वाटतो.